Gauri Avahan 2023 : सोन्याच्या पावलांनी आली गौराई! आज ज्येष्ठ गौरी आवाहन, मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या
Gauri Avahan 2023 : महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण हा देवी गौरी म्हणजेच पार्वतीला समर्पित आहे.

Gauri Avahan 2023 : आज ज्येष्ठा गौरी आवाहन, महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा सण हा देवी गौरी म्हणजेच पार्वतीला समर्पित आहे. हा उत्सव ज्येष्ठ गौरी आवाहनापासून सुरू होतो आणि तीन दिवस चालतो, त्यानंतर ज्येष्ठ गौरी पूजन होते आणि गौरी विसर्जनाने समाप्त होतो. गौरी पूजन किंवा ज्येष्ठ गौरी पूजन म्हणूनही ओळखले जाते, यंदा हा उत्सव 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर 2023 पर्यंत असेल
विवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचा दिवस
या दिवशी गणपती आणि देवी गौरीची पूजा केली जाते. विवाहित स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या चांगल्यासाठी तीन दिवस उपवास करतात. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, देवी पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली. शिवाय, काही भागात गौरी पूजनाला देवी लक्ष्मीच्या उपासनेचे रूप मानले जाते. श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते. तीन दिवसांनी भक्त तिचे विसर्जन करतात.
ज्येष्ठा गौरी आवाहन 2023: तारीख आणि शुभ वेळ
गुरुवार, 21 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन
ज्येष्ठा गौरी आव्हान मुहूर्त - सकाळी 06:09 ते दुपारी 3:35
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरी पूजन
शनिवार, 23 सप्टेंबर 2023 रोजी ज्येष्ठा गौरी विसर्जन - सकाळी 9 ते दुपारी 2 वाजून 56 मिनिटापर्यंत
अनुराधा नक्षत्र प्रारंभ - 20 सप्टेंबर 2023 दुपारी 02:59 वाजता
अनुराधा नक्षत्र संपेल - 21 सप्टेंबर 2023 दुपारी 03:35 वाजता
ज्येष्ठा गौरी आवाहन 2023: पूजा पद्धत
अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात. एका पौराणिक कथेनुसार, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या. तिची प्रार्थना केली. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.
गौरी आवाहन गुरुवार 21 सप्टेंबर 2023 ( प्रथम दिवस)
पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो.
घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापनेच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढतात.
हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढतात.
आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात.
गौरी आगमनवेळी ताट, चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करतात.
गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घर दाखवावे.
सौभाग्याची प्रार्थना करून गौरी आवाहन करतात
गौरी पूजन शुक्रवार 22 सप्टेंबर 2023 (दुसरा दिवस)
दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो.
दुपारी 12 वाजेपर्यंत गौरीला नैवेद्य दाखवतात.
गौरी पूजन आणि आरती करतात
विविध भागानुसार गौरीला नैवेद्य करतात.
गौरी विसर्जन शनिवार 23 सप्टेंबर 2023 (तिसरा दिवस)
तिसरा दिवस म्हणजे गौरी विसर्जनाचा असतो.
यादिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात.
त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात.
यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात.
नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात.
गोड शेवयाची खीरीचा नैवेद्य दाखवतात.
गौरींचा निरोप
गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Visarjan 2023: 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीचे विसर्जन का करतात? पौराणिक कथा जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
