एका दिवसात किती साखर खावी? जास्त साखर सेवन केल्यास काय होऊ शकतं?
एखाद्या व्यक्तीने दररोज किती साखर (Sugar) खावी, हे पूर्णपणे तो दररोज किती शारीरिक हालचाली करतो यावर अवलंबून असते. जास्त साखर खाणे शरीरासाठी फायदेशीर नाही.
Helth News : कोणतीही गोष्ट मर्यादेतच हवी. मर्यादा ओलांडल्यास विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या व्यक्तीने दररोज किती साखर (Sugar) खावी, हे पूर्णपणे तो दररोज किती शारीरिक हालचाली करतो यावर अवलंबून असते. जास्त साखर खाणे शरीरासाठी फायदेशीर नाही. जास्त साखर खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. गरजेनुसार थोडी साखर खाऊ शकता. पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात किती चमचे साखर खावी? किंवा जास्त सेवन केल्यास शरीराला कोणत्या गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं, याबाबतची माहिती पाहुयात.
भारतीय लोक गोड खाण्याचे शौकीन
भारतात, बहुतेक लोक गोड खाण्याचे शौकीन आहेत. कोणताही सण असो किंवा समारंभ असो, मिठाई नक्कीच तयार केली जाते. पण जास्त साखर खाणे तुमच्यासाठी समस्या बनू शकते. गोड खाल्ल्याने शरीरात अनेक आजार निर्माण होतात. निरोगी राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीनं दिवसभरात किती मिठाई खावी हे जाणून घेऊया. भारतातील लोक जितके गोड खातात तितके जगात क्वचितच कोणी खात असेल. लग्नापासून वाढदिवसाच्या पार्टीपर्यंत प्रत्येक फंक्शनमध्ये मिठाई नक्कीच तयार केली जाते. इतकेच नाही तर बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर काहीतरी गोड खातात. आता इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिनच्या संशोधनात असे आढळून आले आहे की भारतातील लोकांना साखरेचे व्यसन लागले आहे ते धोकादायक आहे. भारतात अन्नपदार्थांमध्ये साखरेचा वापर विक्रमी पातळीवर केला जातो. जो अत्यंत धोकादायक आहे. भारतात दरवर्षी 80 टक्के मृत्यू हे मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकारामुळे होतात. हे आजार कोणत्या ना कोणत्या प्रकारे साखरेशी संबंधित आहेत.
एका दिवसात किती चमचे साखर खावी?
निरोगी राहण्यासाठी तुम्ही एका दिवसात किती गोड खाऊ शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की WHO ने एका व्यक्तीला एका दिवसात 6 चमच्यापेक्षा जास्त साखर न खाण्याचा सल्ला दिला आहे. याच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता. तुमच्या आहारात नैसर्गिक साखर असलेल्या अशा गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
जास्त साखर खाल्ल्याने होणारे आजार
जर तुम्ही जास्त साखर खाल्ल्यास तुम्हाला टाइप 1 मधुमेह होण्याचा धोका असतो.
दररोज जास्त साखर खाल्ल्याने स्वादुपिंड जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करतो ज्यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात.
जास्त साखर खाल्ल्याने हृदयाच्या समस्या निर्माण होतात.
जास्त साखरेमुळे लठ्ठपणा वाढू लागतो.
जास्त साखर खाल्ल्याने डोकेदुखी आणि तणाव देखील होतो.
महत्त्वाच्या बातम्या:
Health Tips : मधुमेहातसुद्धा गरजेचं असणारं बायोटिन नेमकं आहे तरी काय? बायोटिनसाठी 'या' पदार्थांचं सेवन करा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )