एक्स्प्लोर

Bird flu Death : 'बर्ड फ्लू'चा जगातील पहिला मानवी बळी, WHO ची माहिती, 'ही' लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा

Bird flu Death : बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर, जगातील पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी WHO कडून करण्यात आली आहे. 

Bird Flu Death in Mexico : बर्ड फ्लूमुळे (Bird Flue Death) मेक्सिकोमध्ये (Mexico) पहिला मृत्यू झाला आहे. हा जगातील पहिला मानवी बळी सांगितला जातोय. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची माहिती दिली आहे. बर्ड फ्लूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर हा पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी WHO कडून करण्यात आली आहे. मृत महिला ही मेक्सिकोची रहिवासी होती. WHO ने इशारा दिला आहे की, हा विषाणू जगभरात मोठ्या प्रमाणावर पसरू शकतो आणि येत्या काही वर्षांत आणखी लोकांना संक्रमित करू शकतो. मेक्सिकोमध्ये H5N1 बर्ड फ्लूमुळे मानवी मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.

जागतिक आरोग्य संघटना सतर्क

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, 23 मे रोजी या रोगाची लागण झाल्याची प्रथम माहिती प्राप्त झाली. या मृत्यूशी संबंधित माहिती आणि रोगामुळे मानवांवर होणारे परिणाम याबद्दल तपासणी सुरू आहे. मात्र, या घटनेनंतर आता जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांच्या निवेदनानुसार मृत महिलेला ताप, श्वास अटकणे, अतिसार, मळमळ आणि अस्वस्थता यासारखी लक्षणे दिसत होती. या पहिल्या मानवी मृत्यूची जागतिक स्तरावर नोंद झाली आहे, तसेच मेक्सिकोमधील मृत व्यक्तीमध्ये एव्हीयन H5 विषाणू संसर्ग झाल्याची ही पहिली घटना आहे. ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितले की, त्यांना यासंबंधित माहिती प्रथम 23 मे रोजी मिळाली होती, ज्यामध्ये मेक्सिकोमधील या घटनेचा उल्लेख आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांशी यापूर्वी कोणताही संपर्क नव्हता. यासंदर्भात कोणताही इतिहास नव्हता. मात्र तिला विविध आजार देखील होते,  ज्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली.

बर्ड फ्लूचे विषाणू कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली? 

आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एव्हियन फ्लूची गंभीर लक्षणे दिसण्यापूर्वी 59 वर्षीय महिला ही तीन आठवडे अंथरुणाला खिळलेली होती. तज्ज्ञांनी, यापूर्वी देखील बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती, तसेच ते म्हणाले की हे विषाणू कोरोनाव्हायरसपेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली असू शकतात.

बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे

डोळ्यांमध्ये लालसरपणा 
ताप 
खोकला
घसा खवखवणे
वाहणारे नाक
स्नायू किंवा शरीरात वेदना
डोकेदुखी
थकवा
श्वास घेण्यात अडचण
अतिसार
मळमळ
उलट्या
फीट येणे

बर्ड फ्लूपासून संरक्षण कसे कराल?

वन्य पक्ष्यांशी संपर्क टाळा.
आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घ्या.
आपले हात पाण्याने आणि साबणाने धुत राहणे महत्वाचे आहे.
अन्न तयार करण्यापूर्वी वापरलेल्या वस्तू चांगल्या प्रकारे धुवा.
अन्न व्यवस्थित शिजवून खा.
बाहेर पडताना मास्क अवश्य घाला.

हेही वाचा>>>

Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget