Health: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यानं वजन कमी होतं का? किती पाणी प्यायला हवं? तज्ञ सांगतात..
शरीरात पाण्याचा योग्य समतोल असणं ही तितकच गरजेचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने वजनात खरंच काही फरक पडतो का? तज्ञ काय सांगतात?
![Health: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यानं वजन कमी होतं का? किती पाणी प्यायला हवं? तज्ञ सांगतात.. Health Benifits of drinking lukewarm water for weight loss Wome health how much water we should drink for weight loss Health: रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यानं वजन कमी होतं का? किती पाणी प्यायला हवं? तज्ञ सांगतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/11/25c46098ff6f18be31b912fd5a0369b017233620042131063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health: तब्येत चांगली राहण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखणं अतिशय आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याचा समस्येला सामोरे जावं लागतं. वजन कमी करण्यासाठी उत्तम आहार, चांगली झोप, आणि व्यायामासह काही छोट्या दैनंदिन सवयींमुळेही वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. शरीरात पाण्याचा योग्य समतोल असणं ही तितकच गरजेचं आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने वजनात खरंच काही फरक पडतो का?
जेवणाआधी पाणी पिल्याने भूक शमते
क्लिनिकल न्यूट्रिशन रिसर्च मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तसेच जे लोक जेवणापूर्वी 300ml पाणी पितात त्यांची भूक शमल्याने कॅलरी इनटेक कमी होतो. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते.
चयापचय सुधारते
दररोज सकाळी ग्लासभर कोमट पाणी प्यायला ने शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत होते. त्यामुळे गॅस अपचन अतिसार अशा पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. रक्ताभिसरण सुधारून कॅलरी बर्न करण्यासही मदत होते. फ्रंटइयर्स इन न्यूट्रिशन या जर्नल मध्ये प्रकाशित एका रिव्ह्यू मध्ये असं सांगण्यात आलंय, पाण्याचे सेवन वाढल्याने अन्नाचं सेवन कमी होऊन शरीरातील चरबी कमी होऊ शकते.
वजनावर पाण्याचा मोठा प्रभाव
आपल्या शरीरातील वजनावर पाण्याच्या पातळीचा मोठा परिणाम असतो. अभ्यासकांच्या मते, ज्या लोकांनी वजन कमी करण्याच्या डायट मध्ये पाण्याचा वापर वाढवला त्यांना इतरांच्या तुलनेत अधिक वजन कमी झाल्याचे दिसून आले. शरिरात पाणी पातळीचा आणि वजनाचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे हायड्रेट राहण्यासाठी शरिरातील पाण्याची योग्य पातळी राखणं गरजेचंय.
वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवं?
सामान्यपणे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिणं हे गरजेचं असतं. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने पचनक्रियेतील अडथळे कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कोणाला किती पाणी प्यायला हवं हे त्याच्या शरीरावर अवलंबून आहे. तज्ज्ञांच्या मते कमीत कमी सात ते आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
हेही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)