Health Tips : बाळाचे दात बाहेर येतायत? 'या' गोष्टी लक्षात ठेवा; कोणतीही अडचण येणार नाही
Health Tips : मुलांना दात येण्याच्या वेळी त्यांच्या हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते.

Health Tips : बाळाचे दात 6 ते 7 महिन्यांच्या वयात येऊ लागतात. मुलांसाठी हा काळ थोडा कठीण आहे. जेव्हा मुलांचे दात बाहेर येतात तेव्हा त्यांना त्यांच्या हिरड्यांमध्ये वेदना जाणवू शकतात. यामुळे मुले अनेकदा चिडचिड करतात. याबरोबरच मुलांना दात येताना जुलाब देखील येऊ शकतात. हे जरी सामान्य असले तरी यामुळे मुलांमध्ये अशक्तपणा येऊ शकतो, त्यामुळे यावेळी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांना दात काढताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून मुलांना दात काढताना वेदना, ताप इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. याशिवाय अनेक घरगुती उपाय हिरड्यांना सूज आणि दुखण्यापासून आराम मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी आहेत.
मसाज केल्याने वेदनेपासून आराम मिळेल
मुलांना दात येण्याच्या वेळी त्यांच्या हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज येऊ शकते. त्यामुळे मुले अनेक वेळा रडू लागतात. अशा वेळी मुलांना आराम मिळवण्यासाठी हात नीट स्वच्छ करून हिरड्यांना हलक्या दाबाने मसाज केल्यावर खूप आराम मिळेल. याशिवाय, तुम्ही लहान मुलाच्या गालावर आणि जबड्याच्या भागाला काही सेंद्रिय तेलाने हलका मसाज करू शकता.
बाळाला द्रवपदार्थ देत राहा
जर मुलाला लूज मोशन होत असतील तर डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि बाळाला योग्य लिक्वीड द्या. दात येताना मुलाला ग्रिपचे पाणी दिले जाऊ शकते. यामुळे पोटदुखीपासून आराम मिळतो. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा. पाणी पाजण्याबरोबरच बाळाला द्रवपदार्थ देत राहा जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.
या गोष्टी खायला द्या
दात येताना मुलांना अशक्तपणा जाणवू शकतो, त्यामुळे त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्या. उकडलेल्या भाज्या, भाज्यांचे सूप, फळांचा बारीक गर, मॅश केलेली केळी, ओट्स, मूग डाळ खिचडी, डाळीचे पाणी अशा गोष्टींचा मुलांच्या आहारात समावेश करा.
हिरड्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे
मुलाला खायला दिल्यानंतर हिरड्या स्वच्छ करा, कारण अन्नाचे कण हिरड्यांना चिकटू शकतात, ज्यामुळे बॅक्टेरियामुळे संसर्ग होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ मऊ कापडाने हलके ओले करून हिरड्या स्वच्छ करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Joint Pain : थंडी वाढताच जुनं दुखणं डोकं वर काढतं, यामागचं खरं कारण माहित आहे का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
