Food : चैत्र नवरात्रीचा 5 वा दिवस! शक्ती, बुद्धीची देवी स्कंदमातेला 'हा' प्रिय नैवेद्य अर्पण करा, रेसिपी जाणून घ्या...
Food : आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केल्यानंतर तिला स्वादिष्ट भोजनही अर्पण करण्यात येत आहे. ज्यामुळे देवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल, सोबतच घरातील सर्वजण प्रसाद खाऊन खूश होतील.
![Food : चैत्र नवरात्रीचा 5 वा दिवस! शक्ती, बुद्धीची देवी स्कंदमातेला 'हा' प्रिय नैवेद्य अर्पण करा, रेसिपी जाणून घ्या... Food lifestyle marathi news 5th day of Chaitra Navratri Make this prasad for goddess Skandamata know the recipe Food : चैत्र नवरात्रीचा 5 वा दिवस! शक्ती, बुद्धीची देवी स्कंदमातेला 'हा' प्रिय नैवेद्य अर्पण करा, रेसिपी जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/cda283a6f1dcf7a26558b5a9d6a8f1ac1712973802098381_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Food : आज नवरात्रीचा (Chaitra Navratri 2024) पाचवा दिवस, आज भक्त स्कंदमातेची पूजा करत आहेत. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. भगवान कार्तिकेयची आई असल्यामुळे तिला स्कंदमाता म्हणतात. माता स्कंदमाता शक्ती आणि बुद्धी प्रदान करते. त्यांची पूजा केल्याने भक्तांना शिक्षण, ज्ञान, विजय आणि यश प्राप्त होते. तुम्ही जर देवीला तिचा आवडता प्रसाद अर्पण करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या स्वादिष्ट शिऱ्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. ज्यामुळे देवीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल, सोबतच घरातील सर्वजण प्रसाद खाऊन खूश होतील.
देवी स्कंदमातेला प्रिय नैवेद्य दाखवा, आशीर्वाद तुम्हाला लाभेल
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केल्यानंतर तिला स्वादिष्ट भोजनही अर्पण करण्यात येणार आहे. तुम्ही देवीला प्रसाद म्हणून केळी, डाळिंब, द्राक्षे आणि आंबा यासह सर्व प्रकारच्या वस्तू अर्पण करू शकता. पण जर तुम्हाला स्कंदमातेला काहीतरी गोड नैवेद्य अर्पण करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला नाचणीच्या शिऱ्याची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही हा शिरा अगदी सहज बनवू शकता आणि नैवेद्य दिल्यानंतर उपवास करणारे लोक ते खाऊ शकतात.
नाचणीचा शिरा बनवण्यासाठी साहित्य
1/2 कप नाचणीचे पीठ
2 कप दूध
1 टेस्पून ड्राय फ्रूट्स
1/2 टीस्पून वेलची पावडर
3 चमचे देसी तूप
चवीनुसार साखर
नाचणीचा शिरा कसा बनवायचा?
नाचणीचा शिरा बनवण्यासाठी कढई मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा.
कढईत तीन ते चार चमचे तूप घालून नाचणीचे पीठ घालून सोनेरी होईपर्यंत तळा.
पीठ सोनेरी झाल्यावर त्यात दूध घालून शिजू द्या.
शिरा सतत ढवळत राहा
मैद्यामध्ये एक चमचा तूप, साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा.
जेव्हा नाचणीचा शिऱ्यातून तूप वेगळे होऊ लागते, तेव्हा गॅस बंद करा
शिरा एका भांड्यात काढा आणि देवीला अर्पण करा.
केळी मालपुआ
साहित्य
2 पिकलेली केळी
1 कप गव्हाचे पीठ
1/4 कप किसलेले खोबरे
1/4 कप चिरलेला सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ता)
1/4 टीस्पून वेलची पावडर
1/4 टीस्पून दालचिनी पावडर
1/4 कप साखर किंवा गूळ (चवीनुसार)
तूप
केळीचा मालपुआ बनवण्याची पद्धत-
पिकलेले केळे एका भांड्यात चांगले मॅश करा जेणेकरून ते पूर्णपणे गुळगुळीत होईल.
मॅश केलेल्या केळीमध्ये गव्हाचे पीठ, किसलेले खोबरे, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, दालचिनी पावडर आणि साखर किंवा गूळ घाला.
मऊ पीठ बनवण्यासाठी सर्वकाही चांगले मिसळा.
जर पीठ खूप घट्ट असेल तर तुम्ही त्यात थोडे पाणी घालू शकता.
आता एका कढईत मध्यम आचेवर तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर पॅनमध्ये एक चमचा पिठ घाला आणि लहान पॅनकेक करा.
एका बाजूला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या,
नंतर मालपुआ उलट करून दुसऱ्या बाजूला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा.
कढईतून मालपुआ काढून टिश्यू पेपरवर ठेवा म्हणजे पेपर अतिरिक्त तूप शोषून घेईल.
वर ड्रायफ्रुट्सने सजवा आणि देवीला अर्पण करा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Food : तुम्हालाही उपवासात वारंवार भूक लागते? हा स्वादिष्ट 'पराठा' खाऊन तर पाहा, रेसिपी जाणून घ्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)