Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबला हवाय कॉफी पार्टनर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"मी 'त्याच्या' शोधात..."
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परब कॉफी पार्टनरच्या शोधात आहे.
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीरांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. यातीलच एक नाव म्हणजे कल्याणची (Kalyan) शिवाली परब (Shivali Parab) होय. आता शिवालीची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवाली परबची खास पोस्ट (Shivali Parab Post)
शिवाली परब सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. आता तिने हाहात कॉफी मग घेतलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. तिच्या या बोल्ड अंदाजातील फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे पोस्ट शेअर करत तिने एक खास कॅप्शनदेखील लिहिलं आहे. तिचं हे कॅप्शन मात्र चर्चेचा विषय ठरत आहे. तिने लिहिलं आहे,"मी माझ्या कॉफी पार्टनरची वाट पाहत आहे".
शिवालीच्या पोस्टवर चाहत्यांचा कमेंट्सचा वर्षाव
शिवालीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिने लिहिलं आहे,"मी कॉपी प्यायला आलो तर चालेल का? खूप खूप सुंदर, मी होऊ का तुझा कॉफी पार्टनर, तुला वाट पाहायला लावणारा तो कोण आहे? कल्याणची चुलबुली, माझी वाट पाहू नको, तू कॉफी पिऊन घे.. गाडीतलं प्रट्रोल संपलंय.. आलोच ढकलत, अशा गंमतीशीर कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
View this post on Instagram
शिवालीच्या या पोस्टवर तिची खास मैत्रीण आणि सहकलाकार बिवाली अवली कोहली अर्थात प्रियदर्खनी इंदलकरनेदेखील (Priyadarshini Indalkar) खास कमेंट केली आहे. तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील ओंकार राऊतने (Onkar Raut) लिहिलं आहे,"कोई तो रोक लो".
शिवालीने गेल्या काही दिवसांपूर्वी 'महाराष्टाची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील विनोदवीर निमिष कुलकर्णीसोबतचा (Nimish Kulkarni) एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं,"डेट विथ माय निब्बा". या पोस्टनंतर शिवाली आणि निमिष रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. निमिष सध्या 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अद्याप दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीर केलेलं नाही.
संबंधित बातम्या