Navri Mile Hitlerla : लीलाने सांगितला कुत्र्यासोबत शूट करतानाचा खास किस्सा, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेटच्या सेटवरची धमाल
Navri Mile Hitkerla : 'टायगरमुळे आम्हाला रिटेक घ्यावा लागला नाही', 'नवरी मिळे हिटलरला'मधील लीलाना म्हणजेच वल्लरी विराज हिने शुटींगवेळीचा किस्सा सांगितला आहे.
Navri Mile Hitkerla Makar Sankranti : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलाची पहिली मकरसंक्रांत साजरी होत आहे. एजे लीलाच्या प्रेमात पडला आहे आणिस त्याला लीलासाठी असलेल्या प्रेमाची जाणीवही झाली आहे. आता मकरसंक्रांतीनिमित्त एजेने लीलासाठी खास हलव्याचे दागिने बनवले आहेत. याआधी एजेने, लीलासाठी खास पाणीपुरी तयार केली होती.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेटच्या सेटवरची धमाल
एजे लिलासोबत एका खास ठिकाणी नेणार आहे, जिथे एजेची मन्याशी पहिल्यांदा भेट होते. मन्या अनपेक्षितपणे एजेच्या घरी येतो, ज्यामुळे एजे थक्क होतो. मन्याने दिलेली आईस्क्रीम लीला खात आहे, पण त्यामागील त्याच्या खऱ्या हेतूंची तिला कल्पना नाही. लिला आजारी असताना एजे तिची काळजी घेतोय, तिच्यासाठी मकरसंक्रांतसाठी हलव्याचे दागिने स्वतः बनवतोय. एजेच्या काळजीने लीला भावूक होते, पण लीलाची अपेक्षा आहे की, एजे आपले मन मोकळं करेल.
वल्लरी विराजने सीनमागचे किस्से
मकरसंक्रांती निमित्ताने मालिकेत पतंग स्पर्धा रंगणार आहे. हा सीन शूट करताना लीला म्हणजेच वल्लरी विराजने काही सीनमागचे किस्से सांगितले आहेत. वल्लरीने सांगितलं की, "या स्पर्धेत मी आणि एजे वेगळ्या टीममध्ये होतो. सीन शूट केला तेव्हा खूप मज्जा केली. आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला, सगळे काळ्या कपड्यांमध्ये होतो, हलव्याचे दागिने घालून फोटोशूट केलं. हळदी-कुंकू केलं आणि मी एजेंसाठी एक खास शेफ कॅप बनवली ज्यात हलव्याचे दागिने लावले होते. आम्ही तिळगूळ वाटले एक्दम मस्त वातावरण होते सेटवर".
कुत्र्यासोबत शूट करतानाचा अनुभव
मकरसंक्रांत सीनमध्ये आमच्या घरचा खास सदस्य म्हणजे टायगर ही सामील झाला होता. तसं त्याच खरं नाव शेरू आहे, तो खूप गुणी कुत्रा आहे. आम्ही जेव्हा फोटो काढत होतो, तेव्हा तो माझ्या बाजूला येऊन बसला आणि तो इतकं सहकार्य करतो की, त्याच्यामुळे आम्हाला एकही रिटेक घ्यावा लागला नाही. त्याने पटापट आपले शॉट्स दिले आणि आमचा मकरसंक्रांत सण एकदम उत्साहात साजरा झाला. हा भाग प्रेक्षकांना प्रेक्षकांना पाहायला नक्की मज्जा येणार आहे." असं वल्लरीने सांगितलं आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :