एक्स्प्लोर

मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप, 12 वर्षांची प्रतीक्षा वाया गेली; इंटरनेट सेन्सेशन बनल्याने कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ

Viral Girl Monalisa : महाकुंभ मेळ्यातील व्हायरल 'ब्युटी' मोनालिसाला घरी परतावं लागलं आहे, यामागचं कारण जाणून घ्या.

Maha Kumbh Viral Beauty Monalisa Bhosale : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. कुंभमेळ्यातील एका व्हायरल सुंदरीची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे. महाकुंभ मेळ्यात रुद्राक्षांच्या माळा विकणारी एक सुंदर मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सावळा रंग, सोनेरी डोळ्यांची ही सुंदरी खूप व्हायरल होत आहे. या तरुणीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून ती आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. पण, तिचं हेच सौंदर्य आता तिच्यासाठी अडचणीचं बनलं आहे.

मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप

प्रयागराज येथील महाकुंभमेळा 2025 मध्ये रुद्राक्ष माळा विकणारी एक तरुणी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली. मूळची इंदूरची असणारी मोनालिसा भोसले कुंभमेळ्यात तिच्या वडिलांसोबत माळा विकण्यासाठी आली होती. यादरम्यानचे तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. व्हायरल सेन्सेशन असलेली मोनालिसा भोसले हिला तिच्या वडिलांनी विक्रीमध्ये घट झाल्यामुळे घरी पाठवले आहे. मोनालिसा हिला अचानक इंटरनेटवर प्रसिद्धी मिळाली, याचा परिणाम त्यांच्या विक्रीवर झाल्यामुळे तिला तिच्या वडिलांनी घरी माघारी पाठवलं आहे.

मोनालिसावर कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरची मोनालिसा प्रयागराज महाकुंभातून घरी परतली आहे. ती येथे माळा विकण्यासाठी आली होती. माळा खरेदी करणारे लोक कमी आणि तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढणारे लोक जास्त असल्यामुळे हे मोनालिसा आणि तिच्या वडिलांसाठी त्रासदायक ठरत आहे. निराश होऊन तिच्या वडिलांनी मोनालिसाला इंदूरला माघारी पाठवलं आहे.

इंटरनेट सेन्सेशन बनल्याने मोनालिसाच्या अडचणीत वाढ

व्हायरल झाल्यानंतरही, मोनालिसा कुंभमेळ्यात हार विकत होती. पण तिच्याभोवती नेहमीच लोकांची गर्दी असायची. तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची, इतकंच काय तर तिच्यासोबत व्हिडीओ बनवण्यासाठी अनेक युट्यूबर्स येऊ लागले. त्यामुळे मोनालिसा तिचे काम करू शकली नाही. या काळात, जेव्हा जेव्हा ती हार विकायला जायची तेव्हा ती मास्क आणि सनग्लासेस घालायची जेणेकरून लोक तिला ओळखू नयेत. पण तरीही लोक तिच्यासोबत सेल्फी काढणे आणि व्हिडीओ बनवणे सोडत नव्हते.

या सगळ्याला कंटाळून मोनालिसा कुंभ सोडून इंदूर झुसी परिसरात तिच्या कुटुंबाकडे आली. मोनालिसाचे कुटुंब येथे बांधलेल्या झोपडपट्टीत राहते. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांनी मोनालिसाला घरी परत पाठवले आहे, तर दोन्ही बहिणी अजूनही कुंभमेळ्यात हार विकत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Shivam Lakhara (@shivam_bikaneri_official)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pushpa 2 Collection : 'स्त्री 2' समोर 'पुष्पा 2' पुन्हा फेल, बॉक्स ऑफिसवर 'सरकटे का आतंक'; कमाईच्या बाबतीत अल्लू अर्जूनच्या चित्रपट अजूनही मागेच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
KKR vs RCB :  एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव
केकेआरची साथ सोडलेल्या स्टारवरआरसीबी डाव लावणार, कोलकाताची नाकेबंदी करण्यासाठी बंगळुरुचं तगडं प्लॅनिंग
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune News : Sharad Pawar - Ajit Pawar एकाच  मंचावर येणार, जयंत पाटीलही उपस्थित ABP MAJHAABP Majha Headlines : 10 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar Jayant Patil:निमित्त बैठकीचं, नव्या राजकीय गुळपीठाचं;अजित पवार-जयंत पाटील एकाच केबिनमध्ये9 Sec Superfast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा : 22 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
KKR vs RCB :  एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव
केकेआरची साथ सोडलेल्या स्टारवरआरसीबी डाव लावणार, कोलकाताची नाकेबंदी करण्यासाठी बंगळुरुचं तगडं प्लॅनिंग
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Rohini  Khadse on Chitra Wagh : चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
चार पक्ष फिरून आरामात तुम्ही विधान परिषदेची जागा मिळवली त्या भाजपच्या सावलीत माझ्या वडिलांचे कष्ट; रोहिणी खडसेंनी चित्रा वाघांना सुनावलं
तमन्ना भाटियाचा डेनिम आउटफिट लुक चर्चेत!
तमन्ना भाटियाचा डेनिम आउटफिट लुक चर्चेत!
Father kills son: पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
पत्नीच्या चारित्र्यावर संशय, IT अभियंत्याकडून पोटच्या 3 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, सिगरेट प्यायला गेल्यावर चाकू-ब्लेड विकत घेतलं अन्...
Embed widget