Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये येणार नवा ट्वीस्ट,श्रीनु-चारुला हळद लागणार अन् ओवी...
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : ओवीवर प्रेम करणाऱ्या श्रीनिवास अर्थात श्रीनूला चारू सोबत लग्न करावे लागत आहे. घरात दोघांच्या हळदीची तयारी सुरू झाली आहे. पण, आता या दोघांचे लग्न होणार का, श्रीनूवर अक्षता पडणार की दुसऱ्यांदा लग्न टळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Saara Kahi Tichyasathi Marathi Serial Updates : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीची स्पर्धा तीव्रतेने सुरू आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सध्या छोट्या पडद्यावर सध्या मालिकांच्या कथानकात ट्वीस्ट येत आहेत. झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi) मालिकेत आता ट्वीस्ट येणार आहे. ओवीवर प्रेम करणाऱ्या श्रीनिवास अर्थात श्रीनूला चारू सोबत लग्न करावे लागत आहे. घरात दोघांच्या हळदीची तयारी सुरू झाली आहे. पण, आता या दोघांचे लग्न होणार का, श्रीनूवर अक्षता पडणार की दुसऱ्यांदा लग्न टळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेची वेळ बदलली तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद कायम आहे. मागील काही एपिसोडपासून मालिकेत ट्विस्ट येऊ लागला आहे. श्रीनूसोबत लग्न करण्याच्या हट्टहासातून चारूने त्याच्यावरच खोटे आरोप केले आहेत. आपण श्रीनुच्या बाळाची आई होणार असल्याचे तिने घरात सगळ्यांना पटवून दिले आहे. चारूच्या या कटामुळे ओवी आणि श्रीनूच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा आला आहे. मात्र, ओवीने आता या प्रकरणामागील सत्य शोधून काढण्याचा चंगच बांधला आहे.
View this post on Instagram
निकीता ही नीरज आणि निशीच्या नात्यात तणाव निर्माण करते आहे. तर, दुसरीकडे ओवी श्रीनूचे प्रेम मिळवण्यासाठी खटपट करत आहे. मुंबईतील एका हॉटेलमधून एक कागद सापडतो, तो कागद ओवीच्या हाती लागतो. ओवी विजयला मुंबईत माहिती गोळा करण्यास सांगते आणि लॅब असिस्टंट कडून खरे रिपोर्ट्स मागवते. तर दुसरीकडे श्रीनु आणि चारू यांचा हळदी समारंभ सुरू आहे. तर, ओवी ही पुरावे गोळा करण्याच्या कामात गुंतलेली आहे. ओवी हुशारीने आपल्या सापळ्यात डॉक्टरला अडकवते आणि ती श्रीनु आणि चारूच्या लग्नाला हजर होते. ओवी डॉक्टरला घेऊन येते, तर विजय हॉटेल मॅनेजरला घेऊन येतो, ज्यामुळे चारुचं खोटं सर्वांसमोर येते.
आता आपला खोटेपणा उघड झालेली चारू आणखी काय नवीन डाव टाकेल? ओवी आणि श्रीनु परत एकत्र येतील का? श्रीनु समोर चारूच सत्य आल्यावर तो काय करणार हे सगळं आता 'सारं काही तिच्यासाठी'च्या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.