Ankita Walawalkar: कोकण हार्टेड गर्लच्या घरी लगीनघाई सुरु; घरात नवरी येताच कुटुंबाचा डान्स, अंकिता झाली भावूक, पाहा व्हिडीओ
Ankita Walawalkar: अंकिता मुंबईवरून सगळी कामं आवरून तिच्या गावी जाते तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला खास सरप्राइज दिलं ते तिनं शेअर केलं आहे. ते पाहून अंकिता भावुक झालेली दिसली. त्याचे डोळे देखील पाणावले.

Ankita Walawalkar: 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकरची (ankita prabhu walawalkar) नेहमीची आपल्या रिल्स आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. आता अशाच आणखी एका व्हिडीओमुळे अंकिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिता वालावलकरच्या घरी लगीनघाई सुरू झाली आहे. बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) पाचव्या सीझननंतर अंकिताच्या फॅन फॉलोईंगमध्ये प्रचंड वाढ झाली. चाहते तिचे व्हिडिओ आणि रिल्स मोठ्या आवडीने पाहतात. अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. अंकिताने तिच्या घरी सुरू झालेल्या लगीनघाईचा व्हिडीओ तिच्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे. या व्हिडीओत अंकिता मुंबईवरून सगळी कामं आवरून तिच्या गावी जाते तेव्हा तिच्या कुटुंबाने तिला खास सरप्राइज दिलं ते तिनं शेअर केलं आहे. ते पाहून अंकिता भावुक झालेली दिसली. त्याचे डोळे देखील पाणावले.
अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय?
अंकिताने तिच्या सोशल मिडियावरती शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती, सर्व शूट आटपून मुंबईतून प्रवास करुन एअरपोर्टने तिच्या कोकणातील घरी जाते. तिथे घरी पोहोचल्यावर अंकिताला तिचं कुटूंब खास भेट देत. घरी पोहोचल्यानंतर दारात तिचं औक्षण होते, त्यानंतर तिच्या घरच्यांनी 'अभी ना जाओ छोडकर' या हिंदी गाण्यावर जमिनीवर बसून तिच्यासाठी खास डान्स केला. अंकिताचे बाबा, तिची आई, तिच्या बहिणी आणि संपूर्ण कुटुंब 'अभी ना जाओ छोडकर' या गाण्यावर नाचताना दिसतात. अंकिता हे छान सरप्राइज पाहून भावुक झालेली दिसते. ती सर्वांकडे पाहत राहते आणि तिच्या डोळ्यांतून पाणी येतं. तिच्यासाठी खास गोड, आणि सर्व सजावट केलेली देखील व्हिडिओमध्ये दिसते.
View this post on Instagram
अंकितासाठी खास 'नवराई' असं नाव लिहिलेली रांगोळी
अंकिता घरी पोहोचल्यावर घरचे तिचं औक्षण करुन तिच्यावर फुलं उधळतात. अंकितासाठी खास 'नवराई' असं नाव लिहिलेली रांगोळी काढलेली दिसून येते. पुढे अंकिताला आवडणारा गोड पदार्थ तिच्यासाठी आणलेला असतो. अंकिता घरच्यांनी दिलेल्या या प्रेमामुळे भारावलेली दिसते. अंकिता लवकरच संगीतकार कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिता बिग बॉसमधून बाहेर आल्यावर तिने प्रेमाची जाहीर कबूली दिली होती, सध्या तिच्या घरी तिच्या लग्नाची मोठी तयारी सुरू झाली आहे.
अंकिताचं अनोखं प्री वेडिंग
अंकिताने इतर जोडप्यांप्रमाणे फोटोशूट न करता, आपल्या आई-वडिलांसोबत आणि बहिणींसोबत फोटोशूट केलं आहे. तिचं गाव, नारळांची बाग, समूद्र आणि सुंदर परिसर यामध्ये तिने आपलं प्री वेडिंग केलं आहे, त्याचा व्हिडिओदेखील तिने तिच्या सोशल मिडियावरती शेअर केला आहे. व्हिडिओसोबत तिने एक पोस्ट लिहली आहे, त्यात ती लिहते, "सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण लग्न टिकलीच ना? आत्तापेक्षा तरी जास्तच…सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरचं आपल्याला समाजात स्थान मिळेल अस नाही…आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्या व्यक्तीसोबतच photoshoot म्हणजे प्रीवेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपुर्ण गोष्टी पुर्ण करण आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे……मी अस म्हणणार नाही की तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटल माझं प्री वेडिंग????".
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
