एक्स्प्लोर

Home Minister : 'ती सव्वा लाखाची पैठणी...', 'होम मिनिस्टर'च्या शेवटच्या भागात पूर्ण झाली अभिनेत्रीची इच्छा; पोस्ट करत म्हणाली...

Home Minister : काहीच दिवसांपूर्वी होम मिनिस्टरचा शेवटचा भाग पार पडला. यावेळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील अभिनेत्रीला सव्वा लाखाची पैठणी मिळाली.

Home Minister : मागील 20 वर्षांपासून घरोघरी रंगलेला पैठणीचा खेळ आता संपला आहे. आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) या कार्यक्रमाने आता निरोप घेतलाय. पण त्यापूर्वी झी मराठी वाहिनीवर होम मिनिस्टरचा विशेष भाग पार पडला. यामध्ये विजेत्या वहिनींना सव्वा लाखाची पैठणी मिळणार होती. 

झी मराठीवरील नायिकाच या भागात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सरस्वती जहागीरदार म्हणजेच अभिनेत्री भूमिजा पाटील हिने ती सव्वा लाखाची पैठणी जिंकली. त्यानंतर भूमिजाने या पैठणीसाठी खास पोस्ट केली आहे. 

भूमिजाची पोस्ट नेमकी काय?

भूमिजाने तिचा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, होय ती सव्वा लाखाची पैठणी मला मिळाली. लहानपणापासून माझी इच्छा होती की, कधीतरी होम मिनिस्टर मध्ये जावं मग मलाही पैठणी मिळेल आदेश भाऊजींच्या हस्ते. Manifest करणं म्हणतात ते हेच असावं. जेव्हा मी पैठणीचा खेळ खेळले तेव्हा अजिबात असं डोक्यात नव्हतं की आपण जिंकावं. मला होम मिनिस्टर मध्ये भाग घेता आलं त्यातच मी खुश होते.  पण माझे सहकलाकार म्हणजेच नवरी मिळे हिटलरला ही टीम माझ्या सोबत होती मला cheer करत होती , त्यांनी मला विश्वास दिला की ही पैठणी तुझीच आहे आणि ही पैठणी तुलाच मिळणार. आणि ते खरं झालं ती "सव्वा लाखाची पैठणी "माझी झाली आणि ही संधी मला झी मराठी मुळे मिळाली.  

View this post on Instagram
 
A post shared by Bhumija Patil (@bhumija_arvind_patil)

20 वर्षांचा प्रवास...

'दार उघड बये... दार उघड...' अशी हाक साधारण 20 वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली. आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) कार्यक्रमाचा पहिला भाग 13 सप्टेंबर 2004 मध्ये भेटीला आला होता. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) ते लाडके भावोजी हा साधारण 20 वर्षांचा प्रवास प्रत्येकासाठी खासच आहे. पण आता हा प्रवास संपला असून  20 वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतलाय. 

ही बातमी वाचा : 

Home Minister : 'पैठणी'चं आदेश भावोजींना खास पत्र, 20 वर्षांचा प्रवास संपला, 'होम मिनिस्टर'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक समितीच्या शिफारसीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
अजितदादांनी डावललं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये छगन भुजबळांविषयी सॉफ्ट कॉर्नर, खासगीत म्हणाले....
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 
आयपीओची मालिका सुरुच, आठवड्यात 3500 कोटींचे 9 IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी 
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Embed widget