(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Home Minister : 'पैठणी'चं आदेश भावोजींना खास पत्र, 20 वर्षांचा प्रवास संपला, 'होम मिनिस्टर'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप
Home Minister : होम मिनिस्टर या कार्यक्रमाने 20 वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला असून यावेळी पोस्टमन काकांनी आदेश भावोजींसाठी खास पत्राचं वाचन केलं.
Home Minister : 'दार उघड बये... दार उघड...' अशी हाक साधारण 20 वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली. आदेश बांदेकर यांच्या 'होम मिनिस्टर' (Home Minister) कार्यक्रमाचा पहिला भाग 13 सप्टेंबर 2004 मध्ये भेटीला आला होता. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) ते लाडके भावोजी हा प्रवास साधारण 20 वर्षांचा प्रवास प्रत्येकासाठी खासच आहे. पण आता हा प्रवास शेवटाला अखेर 20 वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतलाय.
जी पैठणी प्रत्येक गृहिणीसाठी अगदी खास असते, अशा पैठणीचा आणि गृहिणीचा सन्मान आदेश भावोजींना गेली 20 वर्ष केला. त्यामुळे वाहिनीकडूनही या कार्यमाला सन्मानपूर्वक निरोप देण्यात आल्याचं पाहायला मिळालं. झी मराठीवर गणेशोत्सव विशेष- ‘उत्सव बाप्पाचा, खेळ होम मिनिस्टरचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात सागर कारंडेने पोस्टमनकाकांच्या भूमिकेत हजेरी लावली. यावेळी पोस्टमनकाकांनी पैठणीचं खास पत्र आदेश भावोजींसाठी वाचलं आणि सगळेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
पैठणीचं आदेश भावोजींना पत्र
हे पत्र वाचाताना पोस्टमन काकांनी म्हटलं की, “प्रिय आदेश भावोजी, मी तुमचीच पैठणी…श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या मला तुम्ही गावात, चाळीत आणि अगदी तळागाळात पोहोचवलंत. तुमचं काम खूप मोठं आहे. तुम्ही तिचं म्हणणं जगासमोर आणलंत. तिला बोलतं केलंत. खरंतर, ही पैठणी तिच्यामुळे सुंदर दिसते. हे तुम्हीच तिला सांगितलंत.”
View this post on Instagram
'आता विश्रांतीची वेळ झालीये...'
यावर बोलताना आदेश बांदेकरांनी म्हटलं की, 'गेल्या 20 वर्षांमध्ये साधारण 6 हजार 500 भाग झाले. अंदाजे 6 लाख 2250 कुटुंबांबरोबर थेट संवाद साधता आला. या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि माऊलींना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला एक ऊर्जा मिळायची. आजही लाखो कुटुंब ‘होम मिनिस्टर’ची वाट बघत आहेत. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची… आज्ञा असावी.'
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Sade Made Teen : 'पुन्हा एकदा साडे माडे 3', स्टारकास्टचा फोटो समोर; सिद्धार्थच्या पोस्टने वेधलं लक्ष