Bhabiji Ghar Par Hai : एंट्रीआधीच नव्या 'गोरी मेम'ची जादू, आता 'अनिता भाभी'च्या भूमिकेत 'ही' अभिनेत्री
Bhabiji Ghar Par Hai : नेहा पेंडसे 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तव दिसणार आहे.
Bhabiji Ghar Par Hai : 'भाबीजी घर पर हैं' ही मालिका गेल्या सात वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. अनेक कलाकार सात वर्षांनंतरही या मालिकेचा भाग राहिले आहेत तर, काहींनी मालिकेला अलविदा केला आहे. नेहा पेंडसे 'भाबीजी घर पर हैं' मालिकेतून बाहेर पडल्यानंतर आता 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तव (Vidisha Srivastava) दिसणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेहा पेंडसेला अव्यावसायिक (Unprofessional) वर्तनामुळे शोमधून बाहेर फेकण्यात आले आहे. मात्र, नेहाच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता निर्मात्यांनी 'गोरी मेम'च्या भूमिकेत विदिशा श्रीवास्तवचे नाव फायनल केले आहे. नुकताच एक प्रोमो जारी करून शोमध्ये विदिशाची एंट्री दाखवण्यात आली आहे. हा प्रोमो चांगलाच व्हायरल झाला असून विदिशाच्या रुपात नवीन 'गोरी मेम' पाहून चाहते खूप खूश झाले आहेत.
गोरी मेमच्या भूमिकेत दिसणारी सौम्या टंडननेही (Saumya Tandon) दोन वर्षांपूर्वी शो सोडला होता. सोशल मीडियावर शो सोडण्याचे कारण सांगताना तिने सांगितले की, तिला खूप दिवसांपासून एकच पात्र साकारण्याचा कंटाळा आला होता, म्हणून तिने शो सोडला. सौम्याने शो सोडल्यानंतर नेहा पेंडसेने गोरी मेमची भूमिका साकारली. या व्यक्तिरेखेतील नेहाला लोकांना खूप आवडले पण आता तिनेही या शोला अलविदा केला आहे.
संबंधित बातम्या :
- Housefull : अखेर थिएटर गजबजलं.. सिने-नाट्यगृहाबाहेर झळकले हाऊसफुल्लचे बोर्ड
- Kitchen Kallakar : आता मनोरंजनाची चव आणखी वाढणार, 'किचन कल्लाकार'च्या मंचावर होणार मनोरंजनाचा डबल तडका
- Bollywood Upcoming Films : 'पठाण', 'टायगर 3' पासून 'जयेशभाई जोरदार'पर्यंत यशराज प्रॉडक्शनचे 'हे' बिग बजेट सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha