एक्स्प्लोर

Shyamchi Aai Upcoming Movie : 'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर सुजय घेतोय श्यामचा शोध

Shyamchi Aai Upcoming Movie : 'श्यामची आई'साठी राज्य पातळीवर सुजय घेतोय श्यामचा शोध. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं आहे.

Shyamchi Aai Upcoming Movie : काही गोष्टी, तसंच साहित्य हे जणू सोनेरी आठवणींचा ठेवाच असतं. 'श्यामची आई' (Shyamchi Aai) ही कथाही यांपैकीच एक आहे. त्यामुळं जेव्हा कधी 'श्यामची आई'चा उल्लेख होतो, तेव्हा क्षणार्धात श्याम आणि त्याच्या आईची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी रहाते. 'शाळा'सारख्या पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत दाखल झाल्यानंतर नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करत मराठी रसिकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणारा दिग्दर्शक सुजय डहाके (Sujay Dahake) यानं आता 'श्यामची आई' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य उचलल्याचं सर्वांनाच माहित आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करण्यात येणार आहे. सध्या याचीच पूर्वतयारी सुरू असून, सुजय सध्या श्यामचा शोध घेण्यात बिझी आहे.

अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेल्या 'श्यामची आई'साठी श्यामचा शोध घेण्यासाठी सुजयनं एक शोध मोहिम सुरू केली आहे. श्यामची भूमिका साकारू शकेल अशा कलाकाराचा महाराष्ट्र राज्य पातळीवर शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. यासाठी एक प्रसिद्धी पत्रकही प्रकाशित करण्यात आलं असून, 'श्यामची आई' चित्रपटात टायटल रोल साकारण्यासाठी अभिनयाची आवड असलेल्या 8 ते 12 वर्षे वयोगटातील बालकलाकाराची गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यास उत्सुक असणाऱ्या मुलांच्या पालकांनी संपर्क साधण्याचं आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आलं आहे. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. रुपेरी पडद्यावर श्याम साकारण्यास इच्छुक असलेला मुलगा 8 ते 12 वर्षे वयोगटातील असावा. त्याने स्वतःच एखादा मोनोलॉग मोबाईलवर रेकॉर्ड करून दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवर पाठवावा. कोणीही थेट फोन करू नये. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर 2021 आहे. या तारखेनंतर फोन आणि ईमेल बंद करण्यात येतील. यातून एकूण 10 मुलांची निवड केली जाईल. त्यांना मुंबईत आणून, तीन दिवसांची अभिनय कार्यशाळा घेतली जाईल. त्यातून एका मुलाची निवड श्यामची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी निवड केली जाईल. निवड झालेल्या मुलांना सुजय आणि त्याच्या टीमकडून संपर्क साधला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. इच्छुक मुलं आणि पालकांनी shyamchiaai2022@gmail.com आणि 8779624822 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणाऱ्या सुजयनं भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत सुजयनं 15 ऑगस्ट रोजी पोस्टर रिलीजच्या माध्यमातून 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित असेल. यंदाचं वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या 150व्या जयंतीचं आहे. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Railway Job: सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
सरकारी नोकरीची मोठी संधी! आजच अर्ज करा, महिना 50000 रुपये पगार मिळवा
Ananya Panday On Ambani Wedding : अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे मिळाले? अभिनेत्री अनन्या पांडेने अखेर मौन सोडले...
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
एका दिवसात 10 टक्क्यांची तेजी, 'हा' स्टॉक भविष्यातही देणार दमदार रिटर्न्स; तीन ब्रोकरेज हाऊसेसचा गुंतवणुकीचा सल्ला!
Embed widget