Sonu Sood Car Collection: 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत; सोनू सूदच्या गाड्यांचे खास कलेक्शन
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो.
Sonu Sood Car Collection : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. लॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. सोनूकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत अनेक गाड्या सोनूकडे आहे. जाणून घेऊयात सोनूच्या गाड्यांच्या कलेक्शनबाबत...
पोर्श पॅनामेरा
सोनू सूदकडे मेटालिक ब्लू कलरची पोर्श पॅनामेरा ही गाडी आहे. या गाडीची किंमत 2 कोटी रूपये आहे.
ऑडी क्यू 7
व्हाईट कलरची ऑडी क्यू 7 ही आलिशान कार सोनूच्या कार कलेक्शनमध्ये आहे. या कारची किंमत जवळपास 90 लाख रूपये आहे. सोनू अनेकवेळा वेगवेगळ्या कार्यक्रमाला किंवा चित्रपटाच्या शूटिंगला ही गाडी घेऊन जातो.
Mercedes Benz ML Class
सोनूकडे Mercedes Benz ML Class ही गाडी देखील आहे. या गाडीची किंमत 70 लाख आहे.
View this post on Instagram
मारूती झेन
मारूती झेन कार ही सोनूची पहिली गाडी आहे. 3 ते 5 लाख रूपयांपर्यंत या गाडीची किंमत आहे. आजही ही कार सोनूने त्याच्या कार कलेक्शनमध्ये ठेवली आहे.
बजाज चेतक स्कूटर
सोनूकडे चारचाकी गाड्यांबरोबरच दुचाकी बजाज चेतक स्कूटर ही गाडी देखील आहे. 80 च्या दशकातील या स्कूटरची सध्या मार्केट व्हॅल्यू 25 हजार आहे. ही स्कूटर सोनूच्या वडीलांनी घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं