Trending News : तंजानियाचा किली पॉलला बॉलिवूडची भूरळ; किंग खानच्या गाण्यावर लिप्सिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल
सध्या तंजानियाचा (tanzania) किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Trending News : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रिल्स सध्या अनेक लोक सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सध्या तंजानियाचा (tanzania) किली पॉल (kili paul) हा सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारण असे आहे की, किली हा बॉलिवूडच्या प्रेमात पडलाय. तो हिंदी गाण्यांवरील रिल्स तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतो. त्याच्या रिल्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळत आहे.किलीचा शाहरूख खानच्या (Shahrukh Khan) 'कल हो ना हो' (kal ho na ho) या चित्रपटाच्या गाण्यावर लिप्सिंग करतानाचा रिल्स व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'कल हो ना हो' गाण्यावर किलीने केले लिप्सिंग
'कल हो ना हो' या चित्रपटाच्या टायटल साँगवर लिप्सींग करतानाच्या किलीच्या व्हिडीओला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. अनेकांनी त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 93 हजारपेक्षा जास्त लाइक्स किलीच्या या व्हिडीओला मिळाले असून 9 लाख 31 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. किलीच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'लव्ह फ्रॉम इंडिया'
View this post on Instagram
किलीसोबतच त्याची बहिण निमा पॉल देखील सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असते. या दोघांच्या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. बिजली बिजली, टिप टिप बरसा पानी आणि कूसू कूसू या हिंदी गाण्यांवरील व्हिडीओ किलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Ajay Devgn : अजय देवगण नाही... तर 'हे' आहे बॉलिवूडच्या सिंघमचं खरं नाव; पण का बदललं नाव?