(Source: Poll of Polls)
IFFM Awards 2022 : डार्लिंग्ज हिट ठरल्यानंतर शेफाली शाहला बेस्ट अॅक्टरेसचा पुरस्कार, इंडियन फिल्म फेस्टीवल मेलबर्न 2022 मध्ये सन्मान
Shefali Shah wins Award : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार वेब सिरीजसह चित्रपट देणारी अभिनेत्री शेफाली शाहने (Shefali Shah) एका मानाच्या पुरस्काराला गवसणी घातली आहे.
Delhi Crime Season 2 : ओटीटीवर सध्या डार्लिंग्ज हा सिनेमा विशेष गाजत आहे. आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांचा दमदार अभिनय असणाऱ्या या सिनेमामुळे अभिनेत्री शेफाली शाह (Shefali Shah) पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान याचदरम्यान आता तिला एक महत्त्वाचा पुरस्कार देखील नुकताच जाहीर झाला आहे. इंडियन फिल्म फेस्टीवल मेलबर्न 2022 (Indian Film Festival of Melbourne 2022) हा पुरस्कार शेफालीला मिळाला असून तिला डार्लिंग्ज नाही तर जलसा सिनेमासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
जलसा सिनेमात शेफालीने अगदी अप्रतिम अभिनय केला आहे. ज्यात ती एका आईच्या रुपात दिसली असून आपल्या मुलावर संकट आल्यावर आई संपूर्ण जगाशी लढू शकते हा सकारात्मक संदेश शेफालीने सिनेमातून दिला आहे. इन्स्टाग्रामवर शेफालीने या पुरस्काराची माहिती देत फोटो देखील शेअर केला आहे.
View this post on Instagram
लवकरच दिसणार 'दिल्ली क्राईम 2'मध्ये
'दिल्ली क्राईम' (Delhi Crime) या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे. दिल्ली क्राईमचा पहिला सिझन हा दिल्लीमधील चर्चित निर्भया प्रकरणावर आधारित होता. आता या नव्या सिझनमधील मर्डर मिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट बघत आहेत. ट्रेलरमध्ये शेफाली शाह दक्षिण दिल्लीच्या डीसीपी वर्तिका चतुर्वेदी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील शेफालीच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. 'दिल्ली क्राईम- 2' ही सीरिज 26 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. या सीरिजमध्ये पहिल्या सिझनमधील काही कलाकार दिसणार आहेत. रसिका दुग्गल, राजेश तेलांग यांनी या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. तर या सीरीजचे कथानक मयंक तिवारी, शुभ्रा स्वरूप आणि इंशिया मिर्जा यांनी लिहिली आहे. या सीरिजचे संवाद लेखन विराट बसोया आणि संयुक्था चावला शेख यांनी केलं आहे.
'दिल्ली क्राईम' वेब सिरिजमुळे पुन्हा चर्चेत
90 च्या दशकात भारतीय सिनेमांत पदार्पण करणारी शेफाली शाह निवडक चित्रपटात झळकली होती. त्यानंतर दिल धडकने दो हा तिचा तगड्या स्टारकास्टसोबतचा सिनेमाही हिट झाला होता. पण या सर्वानंतर शेफाली शाहला 'दिल्ली क्राईम' या वेब सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या या सीरिजमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. शेफालीचा नुकताच 'डार्लिंग्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात शेफालीसोबतच आलिया भट्टनं देखील काम केलं आहे. या चित्रपटामध्ये शेफालीनं आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: