Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर मोना सिंहनं सोडलं मौन; म्हणाली, 'आमिरनं काय केलं?'
अभिनेत्री मोना सिंहनं (Mona Singh) 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे.
![Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर मोना सिंहनं सोडलं मौन; म्हणाली, 'आमिरनं काय केलं?' laal singh chaddha mona singh break silence on movie boycott Laal Singh Chaddha : 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर मोना सिंहनं सोडलं मौन; म्हणाली, 'आमिरनं काय केलं?'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/15/78f44d461de701a108d048aded23b0171660536022380259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Laal Singh Chaddha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काहींनी या चित्रपटाचं कौतुक केलं तर काही लोक या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. आमिरच्या काही जुन्या वक्तव्यांमुळे नेटकरी लाल सिंह चड्ढा चित्रपटाला ट्रोल करत आहेत. आता चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंहनं (Mona Singh) 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली मोना सिंह?
मोना सिंहनं 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामध्ये गुरप्रीत कौर ही भूमिका साकारली आहे. एका मुलाखतीमध्ये मोना सिंहनं 'लाल सिंह चड्ढा' बायकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. मोना म्हणाली, 'सोशल मीडियावर 'लाल सिंग चड्ढा'च्या बहिष्काराचा ट्रेंड पाहून मला खूप वाईट वाटले. माझ्या मनात आले की, आमिर खानने असे काय केले आहे? की त्याच्याविरुद्ध अशा गोष्टी घडत आहेत. आमिर हा गेली तीस वर्षे आपले मनोरंजन करत आहे.' मोना पुढे म्हणाली, 'मला खात्री आहे की हा चित्रपट प्रत्येक भारतीयाला आवडला आहे.'
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाला आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
आमिरनं दिली होती प्रतिक्रिया
'काही लोकांना वाटतं की मला भारत देश आवडत नाही, या गोष्टीचं मला दु:ख होतं. पण मला हे सांगायचं आहे की ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी सर्वांना विनंती करतो की माझ्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये आणि कृपया थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा.' अशी प्रतिक्रिया आमिरनं बायकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंडवर दिली होती.
'लाल सिंह चड्ढा' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आतापर्यंत देशभरात एकूण 37.96 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.70 कोटी, दुसऱ्या दिवशी 7.26 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 8.5 कोटींचा व्यवसाय केला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)