Narendra Modi on Chhava : छावाची धूम दिल्लीत पोहोचली, नरेंद्र मोदींकडून संभाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य, शिवाजी सावंतांचा खास उल्लेख
Narendra Modi on Chhava : छावाची धूम दिल्लीत पोहोचली, नरेंद्र मोदींकडून संभाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य, शिवाजी सावंतांचा खास उल्लेख

Narendra Modi on Chhava : "मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाहीतर देशाची आर्थिक राजधानी म्हणून पुढे आली आहे. बंधू आणि भगिनींनो आता मुंबईचा उल्लेख झालाय. सिनेमाशिवाय साहित्यावर आणि मुंबईवर पूर्णपणे भाष्य करता येत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईचं आहे, जी मराठी सिनेमासोबतचं हिंदी सिनेमाला देखील वेगळ्या उंचीवर नेलं आहे. सध्या छावा सिनेमाची धूम आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या कांदबरीने करुन दिलाय", असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छावा या सिनेमावर भाष्य केलंय. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक बीज रोवलं होतं, त्याचा वटवृक्ष झालाय - मोदी
नरेंद्र मोदी म्हणाले, आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही साहित्य संमेलनाचा दिवसही अतिशय चांगला निवडला. मी मराठीतून विचार केला तर मला ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. " माझ्या मराठीची बोलू, परि अमृताताशीची पैजा जिंके" आरएसएसची स्थापना करणारेही मराठीच होते. गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक बीज रोवलं होतं, त्याचा वटवृक्ष झालाय. 100 वर्षापासून संघ चालवत आहे. माझ्यासारख्या अनेकांना आरएसएसने देशासाठी जगायला शिकवलं. संघामुळेच मला मराठी भाषेशी संबंध आलाय.
स्वभाषेचा अभिमान मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न करतोय - फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ताराबाईंच भाषण ऐकल्याव त्या भाषणामध्येच आपण रहावं. त्यामध्ये सूर-असूराचं काम करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळाल्यावर पहिलं संमेलन दिल्लीला होतं. मोदींचे आभार मानतो की हे स्वप्न आपण पूर्ण केलं. परकीय आक्रमणाने आपल्या भाषेला प्रदूषित कऱण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांनी आपल्या कामकाजात फारसी व उर्दू शब्द काढून तिथे मराठी शब्द वापरण्याचा पहिला आग्रह त्यांनी केला. स्वभाषेचा अभिमान मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न करतोय. 12 व्या शतकातील ग्रंथांमधून पाहायला मिळतं की आपली भाषा किती समृद्ध आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Narendra Modi : आरएसएसमुळे माझा मराठीशी संबंध, ज्ञानबा-तुकोबाच्या भाषेला राजधानी दिल्लीचं नमन, पवारांसमोर पंतप्रधान मोदी काय काय म्हणाले?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
