Aamir Khan: आमिर खान करणार गजनी 2 ची घोषणा? प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा, ठरलं तर रचला जाणार इतिहास
आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. 2025 मध्ये आमिर खान त्याच्या नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

Gajni 2: बॉलीवूडच्या प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक असणारा आमिर खान (Amir Khan) बॉक्स ऑफिसवर लागोपाठ चांगले सिनेमे देण्यासाठी ओळखला जातो. सध्या तो 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची तयारी करतोय. दरम्यान, 2008 मध्ये प्रदर्शित झालेला गजनी सिनेमा सध्या चर्चेत आलाय त्याच्या सिक्वेलच्या बातमीनं.. आमिर खान आता गजनीचा सिक्वेल काढणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अद्याप त्यांनं गजनीच्या सिक्वेलची घोषणा केली नसली तरी निर्माता अल्लू अरविंद सोबत गजनीची फ्रेंचाईजी बनवण्याबाबत चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आमिर खानने अल्लू अरविंद मधुमंटेना आणि संपूर्ण टीमला गजनी 2 साठी विषय घेऊन येण्यास सांगितल्याचं कळतंय. जर आमिर खानने गजनीच्या सिक्वेलची घोषणा केली तर पहिल्यांदाच शंभर कोटींच्या गजनी चित्रपटाचा सिक्वेल बनवत तो इतिहास रचू शकतो.
पुढच्या वर्षी करणार नव्या चित्रपटाची घोषणा
आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. 2025 मध्ये आमिर खान त्याच्या नव्या ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू असून हा चित्रपट गजनी 2 असू शकतो अशी अटकळ बांधण्यात येत आहे. मीडिया अहवालानुसार, सध्या आमिर खान सुपरहिरो चित्रपटासाठी दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती आहे. जर गजनी २ चित्रपटाचे ठरले तर तो मधु आणि त्याचा पहिला 100 कोटींचा चित्रपटाचा सिक्वेल बनेल.." टीम गजनी 2 साठी विचार मंथन करत आहे आणि ते आमिरला लोकेशच्या चित्रपटाप्रमाणे सादर करेल, आमिर देखील गजनी 2 च्या पहिल्या ड्राफ्टची वाट पाहत आहे.
गजनीसाठी लोकेशनवर काम सुरू असल्याची चर्चा
आमिर खानला सध्या गजनी 2 साठी चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. या सिनेमाच्या लोकेशनलाही नेक्स्ट लेवल नेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय. मीडिया रिपोर्टनुसार सध्या कल्पनाच कॅरेक्टर डेव्हलप होत आहे. गजनी चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली असली तरी अद्याप घोषणा झालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
