RRR 2 : 'आरआरआर 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ऑस्करनंतर राजामौलींची मोठी घोषणा
RRR : 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर एस.एस राजामौलींनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
RRR : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा सध्या जगभरात चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दरम्यान या सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) बेस्ट ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीमध्ये पुरस्कार पटकावला आहे. ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरल्यानंतर राजामौलींनी (SS Rajamouli) लगेचच या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
'आरआरआर' या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. तेव्हापासून चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर एस. एस राजामौलींनी लॉस एंजेलिसमध्ये एका खास पार्टीचे आयोजन केले होते. 'आरआरआर'च्या टीमने या पार्टीला हजेरी लावली होती.
एस.एस राजामौली काय म्हणाले? (SS Rajamouli On RRR 2)
पार्टीदरम्यान एस.एस राजामौली म्हणाले की, "आरआरआर 2' या सिनेमाचा आम्ही विचार करत आहोत. आता ऑस्करनंतर या सिनेमावर आम्ही विशेष मेहनत घेण्यास सज्ज आहोत. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू असून लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करु."
'आरआरआर' या सिनेमात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत होते. 500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमाने जगभरात 1200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. आता 'आरआरआर 2'मध्ये कोण झळकणार आणि हा सिनेमा किती कमाई करणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
'आरआरआर' हा सिनेमा मार्च 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह हिंदीतही या सिनेमाने चांगलीच कमाई केली. या सिनेमाचं कथानक, गाणी, कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आता 'आरआरआर 2'ची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
ऑस्करमध्ये नाटू नाटूची धूम
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आरआरआर सिनेमातील नाटू नाटू या गाण्याची धूम पाहायला मिळाली. या सोहळ्यात काल भैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे गाणं गायलं. त्यांच्या या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या गाण्याला 'स्टँडिंग ओव्हेशन'देखील मिळालं.
संबंधित बातम्या