Shah Rukh Khan : किंग खान 'ग्लोबल आयकॉन' अवॉर्डनं सन्मानित; सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला दुबईत 'ग्लोबल आयकॉन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे.
Shah Rukh Khan Award : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा पुढल्या वर्षी जानेवारीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच किंग खानला दुबईत 'ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्ड'ने (Global Icon Award) सन्मानित करण्यात आले आहे.
शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी दुबईत त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी शाहरुखला ग्लोबल आयकॉनने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर सध्या शाहरुखचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
“All of us, no matter where we live, what colour we are, what religion we follow or what songs we dance to… thrive in a culture of love, peace and compassion.” - #ShahRukhKhan at Sharjah International Book Fair as he receives the award of International Icon of Cinema and Culture pic.twitter.com/YGmmUQ3FwU
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) November 11, 2022
तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. किंग खानचे चाहते फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. शाहरुखने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. किंग खान एका दिवसाला 1.4 कोटी कमावतो.
शाहरुख खानचे ब्लॉक बस्टर सिनेमे!
शाहरुख खानने अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांत काम केलं आहे. 'डर' (Dar) या सिनेमातील शाहरुखची नकारात्मक भूमिका आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ), 'दिल तो पागल है' (Dil to Pagal hai), 'स्वदेश' (Swades), वीर जारा (Veer Zara), 'जब तक है जान' (Jab Tak Hai Jaan), माइ नेम इज खान (My Name is Khan) अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
शाहरुख खानचे आगामी सिनेमे
शाहरुख खानचा आगामी 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. 'जवान' सिनेमातदेखील शाहरुख दिसणार आहे. तसेच तापसी पन्नू आणि राजकुमार हिरानीच्या आगामी 'डंकी' सिनेमात शाहरुखची झलक पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; 'पठाण'ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
