Shah Rukh Khan Birthday : किंग खानच्या फोटोने पुन्हा उजळला बुर्ज खलिफा; 'पठाण'ला विशेष वाढदिवसाच्या शुभेच्छा
Shah Rukh Khan Birthday : शाहरुख खानच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शाहरुख खानला बुर्ज खलिफावर शुभेच्छा देण्यात आल्या.
Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) नुकताच 57 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाहरुखनेही चाहत्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) चित्रपटाचा टीझर रिलीज केला. त्याचवेळी किंग खानचा वाढदिवस खास बनवण्यासाठी दुबईतील बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) पुन्हा एकदा त्याचे अभिनंदन करण्यात आले. शाहरुखला बुर्ज खलिफावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची ही सलग पाचवी वेळ आहे.
पाहा व्हिडीओ :
#BurjKhalifa lights up in celebration of the birthday of the great bollywood star, Shah Rukh Khan’s! Lets wish him a Happy Birthday pic.twitter.com/1Q55agSjXa
— Burj Khalifa (@BurjKhalifa) November 2, 2022
बुर्ज खलिफाने दिल्या शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो' या संदेशाने दुबईची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक इमारत उजळून निघाली होती. यासोबतच या इमारतीवर शाहरुखचा फोटोही दाखवण्यात आला होता. याशिवाय शाहरुखच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या प्रसिद्ध चित्रपटातील 'तुझे देखा तो ये जाना सनम' हे गाणेही तेथे वाजवण्यात आले. शाहरुख बुर्ज खलिफावर दिसण्याची ही पाचवी वेळ आहे. 2021 मध्ये बुर्ज खलिफाने शाहरुखला त्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित केले होते.
'पठाण' चित्रपटाचा टीझर रिलीज
Apni kursi ki peti baandh lijiye…#PathaanTeaser OUT NOW! Celebrate #Pathaan with #YRF50 only at a big screen near you on 25th January, 2023. Releasing in Hindi, Tamil and Telugu. @deepikapadukone | @TheJohnAbraham | #SiddharthAnand | @yrf pic.twitter.com/eZ0TojKGga
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 2, 2022
दुसरीकडे, शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाच्या टीझरबद्दल बोलायचे झाले तर, यात शाहरुख खान जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. त्याचा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. शाहरूखने ट्विट केलेल्या या टीझरला अनेक चाहत्यांच्या लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. सोशल मीडियावरही टीझरवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, 'पठाण' ची कथा पठाण नावाच्या रॉ एजंटभोवती फिरते, हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Pathaan Teaser: शाहरुख आणि जॉनचा खास लूक तर दीपिकाचा ग्लॅमरस अंदाज; पठाणचा जबरदस्त टीझर रिलीज