Rakul Preet Singh Wedding : वयाच्या 33 व्या वर्षी रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात; बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत घेणार सात फेरे? वेडिंग डेट समोर
Rakul Preet Singh Wedding Date : अभिनेत्री रकुल प्रीत सिंह 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (Jackky Bhagnani) ती लग्न करणार असल्याचा अंदाज आहे.
Rakul Preet Singh Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या ती नववर्षाच्या स्वागतासाठी फिरायला गेली आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींसोबत ती परदेशात फिरायला गेली आहे. आता अभिनेत्री संसार थाटणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत (Jackky Bhagnani) ती लग्न करणार असल्याचा अंदाज आहे.
रकुल प्रीत सिंहने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती परदेशात नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत रकुल लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. अद्याप या जोडप्याने अधिकृतरित्या काहीही माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचं डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. गोव्यात त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडेल. रकुल सध्या थायलँडमध्ये जॅकीसोबत एन्जॉय करत आहे. बॉयफ्रेंडचा वाढदिवसदेखील ती परदेशात साजरा करणार आहे.
रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जगजाहीर केलं. वाढदिवशी जॅकीसोबतचा फोटो शेअर करत तिने एक खास पोस्ट लिहिली होती. रकुलने जॅकीला आपला खास मित्र आणि खास भेट असं म्हटलं होतं. जॅकी हा निर्माता असून रकुलचा शेजारीदेखील आहे. कोरोनाकाळात कॉमन मित्रांच्या माध्यमातून रकुल आणि जॅकीची पहिली भेट झाली होती.
रकुल प्रीत सिंहचा सिनेप्रवास...
रकुल प्रीत सिंहने हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'गिल्ली' या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'यारिया' या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत. रकुल 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती. मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरची सुरुवात केली. आज ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
संंबंधित बातम्या