Most Valued Indian Celebrity in 2022: रणवीर सिंह ठरला सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी, अक्षय तिसऱ्या तर शाहरुख दहाव्या क्रमांकावर; पाहा सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा मोस्ट व्हॅल्यूड इंडियन सेलिब्रिटी (Most Valued Indian Celebrity in 2022) ठरला आहे.

Most Valued Indian Celebrity in 2022: क्रॉल या कंपनीनं सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशनच्या रिपोर्टची (Brand Valuation Report 2022) घोषणा केली. या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्युएशन असणाऱ्या भारतातील टॉप 25 सेलिब्रिटींच्या (Most Valued Indian Celebrity in 2022) नावांच्या यादीचा समावेश आहे. या यादीमध्ये मनोरंजन आणि क्रिडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत. या यादीनुसार, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी ठरला आहे. तसेच अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) या सेलिब्रिटींच्या नावाचा देखील या यादीमध्ये समावेश आहे.
साऊथ स्टार्सच्या नावांचे देखील यादीत समावेश
2022 हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी खास ठरले होते. पुष्पा, केजीएफ यांसारखे चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाले. सेलिब्रेटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्टच्या मोस्ट व्हॅल्यूड इंडियन सेलिब्रिटींच्या यादीमध्ये काही साऊथ स्टार्सचा देखील समावेश आहे. ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्ट 2022 मध्ये रणवीर सिंहची ब्रँड व्हॅल्यू 181.7 मिलियन डॉलर एवढी आहे. त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जवळपास 29.1 टक्के वाढ झाली आहे.
दक्षिण भारतीय चित्रपटातील स्टार्स आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या यशाला प्रेरित होऊन यंदाची थीम ही ‘Beyond the Mainstream’ अशी ठेवण्यात आली आहे, असं क्रॉल कंपनीच्या अविरल जैन यांनी सांगितलं.
पाहा यादी
Rank (2022 Report) |
सेलिब्रिटी |
ब्रँड व्हॅल्यू (USD mn) |
1 |
रणवीर सिंह (Ranveer Singh) |
181.7 |
3 |
अक्षय कुमार (Akshay Kumar) |
153.6 |
4 |
आलिया भट्ट (Alia Bhatt) |
102.9 |
5 |
दिपीका पादुकोण (Deepika Padukone) |
82.9 |
7 |
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) |
79.0 |
9 |
हृतिक रोशन (Hrithik Roshan) |
71.6 |
10 |
शाहरुख खान (Shah Rukh Khan) |
55.7 |
11 |
सलमान खान (Salman Khan) |
54.5 |
12 |
रणबीर कपूर (Ranbir Kapoor) |
54.5 |
13 |
आयुष्मान खुराणा (Ayushmann Khurrana) |
49.5 |
15 |
अनुष्का शर्मा (Anushka Sharma) |
41.7 |
16 |
कियारा आडवाणी (Kiara Advani) |
38.3 |
17 |
करिना कपूर (Kareena Kapoor) |
36.5 |
17 |
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) |
36.5 |
20 |
अल्लू अर्जुन (Allu Arjun) |
31.4 |
21 |
सारा आली खान (Sara Ali Khan) |
28.0 |
21 |
वरुण धवन (Varun Dhawan) |
28.0 |
25 |
रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) |
25.3 |
रणवीरचे चित्रपट
गेल्या वर्षी रणवीरचा 'सर्कस' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 28 जुलै 2023 रोजी रिलीज होईल, असं म्हटलं जात आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :
किंग विराटची 5 वर्षाची बादशाहत संपली, आता रणवीर सिंह पहिल्या क्रमांकावर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
