Madhuri Dixit : माधुरी दीक्षितचे 'हे' आहेत 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक; 'धक धक गर्ल'चे फोटो पाहून तुमचीही नजर हटणार नाही!
Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिच्या चित्रपटांचा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. तिचे 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक चाहते कधीही विसरू शकत नाहीत.
Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीच्या नावावरुनच चित्रपट हिट होत असतात. आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देण्याचा ती प्रयत्न करत असते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. लहानमुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच माधुरीने आपल्या अदांनी घायाळ केलं आहे. बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांचा ती भाग आहे. अभिनयानंतर तिने आता निर्मितीक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरीचा समावेश होतो. पण खरंतर आजही माधुरीची क्रेझ कायम आहे. आघाडीच्या अभिनेत्रींना लाजवेल असा माधुरीचा अभिनय आणि सौंदर्य आहे. माधुरीचे 10 ऑनस्क्रीन आयकॉनिक लूक तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. 'धक धक गर्ल'च्या या फोटोंवरुन तुमचीही नजर हटणार नाही.
माधुरी दीक्षितचा जन्म 15 मे 1965 रोजी मुंबईत झाला आहे. तिला खरं तर तिला अभिनेत्रीपेक्षा डॉक्टर व्हायचं होतं. राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत 'अबोध' हा माधुरीचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. पुढे 'तेजाब' या चित्रपटाच्या माध्यमातून माधुरीने स्वत:ला सिद्ध केलं. या चित्रपटात माधुरीने आपल्या नृत्य आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं.
'तेजाब'नंतर माधुरीचं आयुष्य पूर्णपणे बदललं. एकापेक्षा एक चित्रपट देत माधुरीने सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं. अभिनेत्रीच्या यशस्वी चित्रपटांमध्ये राम-लखन, प्रेम ग्रन्थ, हम आपके है कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रास्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, देवदास, अंजाम, बेटा, दिल, राजासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
माधुरीच्या हिट चित्रपटांमध्ये तिच्या लूकवरदेखील खास लक्ष देण्यात आलं आहे. चित्रपटांतील तिच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'दिल तो पागल है' या चित्रपटात माधुरीने एका साध्यासरळ मुलीचं पात्र निभावलं होतं. तिला नृत्याची आवड असते. चित्रपटातील तिचा लूक खूपच सिंपल होता.
'हम आपके है कौन'चा समावेश माधुरीच्या हिट चित्रपटांमध्ये केला जातो. या चित्रपटाचं कथानक, गाणी, कलाकारांचा दमदार अभिनय अशा सर्वचं गोष्टींनी प्रेक्षकांना जिंकून घेतलं. पण या सगळ्यात माधुरीचा लूक चर्चेत आला. माधुरीने नेसलेली जांभळ्या रंगाची साडी चाहते कधीही विसरू शकणार नाहीत.
'बेटा' या चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. या चित्रपटातील धक धक हे रोमँटिक गाणं चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरलं. या गाण्यात माधुरीने नेसलेली पिवळ्या रंगाची साडी तरुणींना आवडली होती.
खलनायक या चित्रपटातील 'चोली के पीछे क्या है' या गाण्यात माधुरी बंजारा लूकमध्ये दिसून आली होती. आऊटफिट, दागिने आणि हातातील पांढऱ्या रंगाच्या बांगड्यांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
देवदास चित्रपटातील चंद्रमुखीच्या माध्यमातून माधुरीने लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं. या चित्रपटातील माधुरीचा लूक कोणीही विसरू शकणार नाही.
माधुरीचा कलंक हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवण्यात कमी पडला. पण तिच्या चाहत्यांसाठी मात्र हा चित्रपट खास होता. अनेक वर्षांनी माधुरीने संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील माधुरीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सिनेसृष्टी गाजवल्यानंतर माधुरीने 'द फेम गेम' या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं. या सीरिजमधील अभिनेत्रीचा लूक चाहत्यांना आवडला होता.
संबंधित बातम्या