Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार
मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप झालं, पालकमंत्रीही ठरले मात्र दोन जिल्ह्यांचा तिढा अद्यापही कायम आहे...रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा सांगितलाय...त्यामुळे घोषित झालेल्या पालकमंत्रिपदांना स्थगिती देण्यात आली...यावरुन महायुतीत वादंग पहायला मिळतंय...अशातच पालकमंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीये...पालकमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं म्हणत अजितदादांनी चेंडू फडणवीसांच्या कोर्टात ढकलला तर लवकरच पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल असं म्हणत फडणवीसांनीही वेळ मारून नेली...






















