एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2022: लोकल ते ग्लोबल! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे पहिले लोककलाकार ठरले राजस्थानचे मामे खान

Cannes Film Festival 2022: राजस्थानी गायक मामे खान (Mame Khan) यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांची जादू दाखवली आहे. अशा प्रकार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे ते पहिलेच लोककलाकार ठरले आहेत.

Cannes Film Festival 2022: जगातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जाणारा ‘कान्स चित्रपट महोत्सव 2022’ (Cannes Film Festival 2022) नुकताच सुरू झाला आहे. या सोहळ्याशी संबंधित अनेक फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. परदेशी सेलिब्रिटींसोबतच भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटीही यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. यंदाचा ‘कान्स’ महोत्सव भारतासाठी खूप खास आहे. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा यंदा ‘कान्स ज्युरी सदस्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. दीपिकासह अनेक बॉलिवूड कलाकार देखील या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, या रेड कार्पेटवर पहिल्यांदाच एक भारतीय लोककलाकार देखील अवतरला आहे.

राजस्थानी गायक मामे खान (Mame Khan) यांनीही कान्सच्या रेड कार्पेटवर त्यांची जादू दाखवली आहे. अशा प्रकार कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारे ते पहिलेच लोककलाकार ठरले आहेत. कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊन त्यांनी एक नाव इतिहास रचला आहे.

लूकचीही चर्चा!

मामे खान यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपली देसी स्टाईल दाखवली. रेड कार्पेटवर चालताना त्यांनी पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान केला होता. त्यांनी रंगीबेरंगी नक्षीदार कोट आणि गुलाबी कुर्ता परिधान केला होता. डोक्यावर खास राजस्थानी पगडी घालून त्यांनी आपला लूक पूर्ण केला. त्यांच्या या देसी अवताराची देखील कान्समध्ये चर्चा आहे.

कोण आहेत मामे खान?

राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या सट्टो या छोट्याशा गावाचे रहिवासी असणारे मामे खान आज राजस्थानच्या लोककलांचा अभिमान बनले आहेत. आपल्या कलेने त्यांनी जगभरात नाव कमावले आहे. आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या मामे खान यांना ‘पद्मश्री पुरस्कारा’नेही गौरवण्यात आले आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात मामे खान बॉलिवूड कलाकारांसह रेड कार्पेटवर उपस्थित होते. हा मान मिळवणारे ते राजस्थानमधील पहिले कलाकार आहे. मामे खान लोककलांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या आवाजाची जादू पसरवत आहेत. नुकतेच त्यांनी अभिषेक बच्चनच्या 'दसवीं' चित्रपटातील 'म्हारा मन होयो नखरालों...' हे गाणे गायले आहे. गाण्यात अभिषेक दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करताना दिसला होता. मामे यांनी याआधी हृतिक रोशनच्या 'लक बाय चान्स'मधील 'बाओ रे' हे गाणे गायले आहे. ‘लक बाय चान्स’, ‘नो वन किल्ड जेसिका’ आणि ‘सोनचिडीया’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.

संबंधित बातम्या

Cannes Film Festival : पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा; भारत-फ्रान्स नात्यावर म्हणाले...

Cannes Film Festival 2022 : ज्युरींसोबत डिनरला पोहोचली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीचा ‘कान्स’ लूक होतोय व्हायरल!

Cannes Film Festival 2022 : एक दिवस कान्स भारतात होईल; दीपिकाचा विश्वास

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern 2: 'मुळशी पॅटर्न 2' ची घोषणा, कधी रिलीज होणार अन् कोणता कलाकार झळकणार, नवी अपडेट समोर
'मुळशी पॅटर्न 2' ची घोषणा, कधी रिलीज होणार अन् कोणता कलाकार झळकणार, नवी अपडेट समोर
Anaya Bangar: 'उंच अन् पिळदार शरीरयष्टी...' अनाया बांगरला आवडतात 'असे' पुरुष; तिला पार्टनर हवा तरी कसा?
'उंच अन् पिळदार शरीरयष्टी...' अनाया बांगरला आवडतात 'असे' पुरुष; तिला पार्टनर हवा तरी कसा?
Singer Death: प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्रसिद्ध गायकाचं निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Janhavi Kapoor Peddi: छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली
छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Maharashtra Live blog updates: लातूर एमआयडीसीतील पाच गोदामांना भीषण आग, पाच तास आग विझवण्यासाठी प्रयत्न
Maharashtra Live blog updates: लातूर एमआयडीसीतील पाच गोदामांना भीषण आग, पाच तास आग विझवण्यासाठी प्रयत्न
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
LPG Gas subsidy Ujjwala Scheme: घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Embed widget