एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रणबीरचा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल

Aniaml Movie OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहता येणार आहे.

Animal OTT Release : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे.

रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आज रिलीजच्या एक महिन्यानंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 2023 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. 

ओटीटीवर पाहायला मिळणार अनकट सीन्स

'अ‍ॅनिमल' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहे. ओटीटीवर या सिनेमातील अनकट सीन्स पाहायला मिळणार असल्याने काही सिनेप्रेमींना पुन्हा एकदा हा सिनेमा पाहायचा आहे. या सिनेमात बाप-लेकाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

'अ‍ॅनिमल' या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आता प्रेक्षकांना फक्त या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा आहे. 'अॅनिमल'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Animal The Film (@animalthefilm)

'अ‍ॅनिमल' ओटीटीवर कधी येणार? (Animal OTT Release)

मीडिया रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. ट्रेंड्सनुसार, सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर 45-60 दिवसांत सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत असतो. 

'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection)

'अ‍ॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला होता. भारतात या सिनेमाने 540.84 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 882.40 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. 'टायगर 3','गदर 2' आणि 'पठाण'चाही रेकॉर्ड या सिनेमाने ब्रेक केला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor: 'अॅनिमल' साठी रणबीरनं जिममध्ये घाम गाळला, 11 किलो वजन वाढवलं अन् सेटवर केला वर्कआऊट; कोचने सांगितली पडद्यामागची मेहनत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget