Ranbir Kapoor: 'अॅनिमल' साठी रणबीरनं जिममध्ये घाम गाळला, 11 किलो वजन वाढवलं अन् सेटवर केला वर्कआऊट; कोचने सांगितली पडद्यामागची मेहनत
'अॅनिमल' (Animal) या चित्रपटातील रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लूकनं आणि चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटामधील रणबीरच्या फिटनेसनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Ranbir Kapoor Gain Weight For Animal: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील रणबीर कपूरच्या लूकनं आणि चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटामधील रणबीरच्या फिटनेसनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे. पण रणबीर कपूरनं 'अॅनिमल' चित्रपटामधील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतली आहे. याबाबत त्याच्या फिटनेस कोचनं माहिती दिली आहे.
रणबीरचे फिटनेस कोच शिवोहम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणबीरनं अॅनिमल चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीची झलक दाखवली आहे. रणबीर कपूरच्या वर्कआउटचे अनेक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये शिवोहमने रणबीर कपूरच्या शेड्युलबद्दलही लिहिले आहे.
11 किलो वजन वाढवलं (Ranbir Kapoor Gain Weight For Animal)
शिवोहम यांनी सोशल मीडियावर रणबीर कपूरच्या दोन फोटोंचा कोलाज शेअर केला होता ज्यामध्ये रणबीरचा 'तू झुठी मैं मक्कार' चित्रपटामधील फिट लूक दिसत होता. फिटनेस कोचनं दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी रणबीरचे वजन 71 किलो होते. रणबीरच्या दुसऱ्या फोटोमध्ये त्याचे वजन वाढवलेले दिसत आहे. रणबीरनं अॅनिमल चित्रपटासाठी 11 किलो वजन वाढवले आहे. त्याने चित्रपटासाठी 82 किलो वजन केले. रणबीरच्या या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर करुन शिवोहमने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे सर्व 2021 मध्ये सुरू झाले जेव्हा आम्ही लव रंजनच्या तू झुठी मैं मक्कारसाठी बीच बॉडी लूकची तयारी सुरू केली. त्यानंतर 2022 मध्ये जेव्हा आम्ही संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अॅनिमल' चित्रपटाची तयारी सुरू केली."
View this post on Instagram
चित्रपटाच्या सेटवर रणबीरनं केला वर्कआऊट
शिवोहम यांनी रणबीर कपूरचा चित्रपटाच्या सेटवर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शिवोहमने कॅप्शनमध्ये लिहिले, 'पडद्यामागील मेहनत खूप कमी लोकांना माहीत आहे. 100 तासांची तयारी, शिस्त आणि सातत्य आणि कधीही हार न मानण्याची मजबूत चॅम्पियन मानसिकता. यामुळेच सर्व घडते."
View this post on Instagram
संबंधित बातम्या