Ira khan Kelvan: थाटात पार पडलं आमिर खानच्या लेकीचं केळवण; आयरानं घेतला उखाणा, म्हणाली, "मला मराठी येत नाही पण..."
Ira khan Kelvan: नुकतेच आयराचे केळवण पार पडले आहे. केळवणाच्या कार्यक्रमात आयरानं खास उखाणा देखील घेतला.
Ira khan Kelvan: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानचा (Ira Khan) विविह सोहळा लवकरच पार पडणार आहे.मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) आयरा लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच आयराचे केळवण पार पडले आहे. आयरानं केळवणाच्या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तसेच केळवणाच्या कार्यक्रमात आयरानं खास उखाणा देखील घेतला.
आयराचा उखाणा
नकात नथ आणि पिंक कलरची साडी असा खास लूक आयरानं केळवणाच्या कार्यक्रमासाठी केला होता. आयरानं तिच्या केळवणाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोमध्ये आयराचा होणारा पती नुपूर देखील दिसत आहे. आयरानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती उखाणा देखील घेताना दिसत आहे. ती म्हणते, "मला मराठी येत नाही पण पॉपोयसाठी मी कधी नाही म्हणत नाही" उखाणा घेतल्यानंतर आयरा ही नुपूरला खास खाऊ घालते.
आयराच्या केळवणाला मिथिलानं लावली हजेरी
आयरानं शेअर केलेल्या केळवणाच्या कार्यक्रमाच्या फोटोमध्ये अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) देखील दिसत आहे. आयरानं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
कधी पार पडणार आयरा आणि नुपूरचा लग्नसोहळा?
एका मुलाखतीमध्ये आमिरनं सांगितलं, आयरा ही 3 जानेवारीला लग्न करत आहे. आयरा खान ही फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर त्यांचा लग्नसोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. तसेच 13 जानेवारी रोजी मुंबईत आयराचे ग्रँड वेडिंग रिसेप्शन होणार आहे, असे म्हटले जात आहे.
एका मुलाखतीमध्ये आमिरनं त्याच्या होणाऱ्या जावयाबद्दल सांगितलं होतं की, "आयरानं निवडलेल्या मुलाचे पेट नेम हे पोपॉय आहे. तो एक ट्रेनर आहे, त्याचे हात पोपॉयसारखे आहेत पण त्याचे खरे नाव नुपूर आहे. तो एक चांगला मुलगा आहे. आयरा ही डिप्रेशनशी झुंज देत होती, तेव्हा तो तिच्यासोबत होता. तो खरोखरच तिच्या पाठीशी उभा राहिला आणि तिला भावनिक आधार दिला."
आयराचा होणारा पती नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती.आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :