Ira Khan Wedding: आधी कोर्ट मॅरेज, मग राजस्थानमध्ये लग्नसोहळा; मराठमोळ्या फिटनेस ट्रेनरसोबत आमिरची लेक आयरा बांधणार लग्नगाठ
Ira Khan Wedding: आयरा ही आधी नुपूरसोबत कोर्ट मॅरेज करणार आहे त्यानंतर नुपूर आणि आयरा यांचा लग्नसोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे.
Ira Khan Wedding: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आयरा लवकरच मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न करणार आहे. आयरा ही आधी नुपूरसोबत कोर्ट मॅरेज करणार आहे त्यानंतर नुपूर आणि आयरा यांचा लग्नसोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे.
एका रिपोर्टनुसार, आयरा खान ही फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर त्यांचा लग्नसोहळा राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे.
कोर्ट मॅरेजनंतर आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे कार्यक्रम उदयपूरमध्ये होणार आहेत. हे सोहळे तीन दिवस चालणार आहेत. या सोहळ्याला आयरा आणि नुपूर यांच्या मित्रांसह कुटुंबातील सदस्यही उपस्थित राहणार आहेत. मनोरंजनसृष्टीमधील लोक या कार्यक्रमाला येणार नाहीत. रिपोर्ट्सनुसार, आमिर खान आयराच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. तो सध्या तयारीमध्ये व्यस्त आहे.
आयरा आणि नुपूर यांची गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट झाली होती. त्यांच्या एंगेजमेंटचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामधील एका व्हिडीओमध्ये आमिर खान डान्स करताना दिसत होता. आयरा खानच्या एंगेजमेंटसाठी सोहळ्याला संपूर्ण खान कुटुंबीय उपस्थित होते. यामध्ये आमिर खान, किरण राव, आयराचा भाऊ जुनैद खान, आझाद राव खान यांच्यासह जवळची मित्र मंडळीही उपस्थित होती.
View this post on Instagram
आयरा आणि नुपूर दोघेही 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. तो वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतो.
आयरा ही नुपूरला कशी भेटली होती? याबाबत तिनं एका मुलाखतीत सांगितले होते की. आयरा म्हणाली होती- मी 17 वर्षांची असताना पोपने मला फिटनेस ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. मी त्याच्याकडे सुपरफिट व्यक्ती म्हणून बघत होते. मी त्याचं खूप कौतुक करायचे. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि मग आम्ही एक मेकांना डेट करू लागलो.
महत्वाच्या बातम्या :