Satara Crime : पती पत्नीच्या भांडणात दहा घरांना आग; 50 लाखांचं नुकसान, पतीला अटक
Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील माजगावात पत्नीशी भांडण झाल्यानंतर राग अनावर झालेल्या पतीनं स्वतःचंच घर पेटवून दिलं. या व्यक्तीच्या कृत्याची किंमत शेजाऱ्या-पाजाऱ्यांना मोजावी लागत आहे.
Satara News : पाटण तालुक्यातील माजगाव इथं पत्नीशी भांडण केल्यानंतर पतीनं स्वतःच्या घराला आग लावली. यावेळी आगीनं रौद्ररुप धारण केल्यानं शेजारील 10 घरांनी देखील पेट घेतला. आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रूपयांचं नुकसान झालं असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली.
सातारा जिल्ह्यातील माजगावात पत्नीशी भांडण झाल्यानंतर राग अनावर झालेल्या पतीनं स्वतःचंच घर पेटवून दिलं. पतीच्या या कृत्याची किंमत आजूबाजूच्यांना आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांना मोजावी लागत आहे. पत्नीसोबतच्या रागातून या व्यक्तीनं स्वतःचं घर पेटवून दिलं. परंतु, आग एवढी भीषण होती की, त्यामध्ये आजूबाजूची जवळपास 10 घरं जळून खाक झाली. या घटनेत सुमारे 50 लाखांहून अधिक नुकसान झालं असून पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
पाटना तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती कारणातून भांडणं सुरु होती. भांडण एवढ्या टोकाला गेलं की, पतीनं स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेव्हा घरातील सिलेंडरनंही पेट घेतला. त्यानंतर या आगीनं रौद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला. ही सर्व घरं जळून खाक झाली. या आगीत सुमारे पन्नास लाखांहून अधिक रूपयांचं नुकसान झालं असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली. संबंधित पतीला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाळणाऱ्या पतीला मात्र ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
