एक्स्प्लोर

Pune : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येप्रकरणी ब्रिगेडियरवर गुन्हा दाखल

बुधवारी पुण्यामध्ये लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिलेने आत्महत्या केली होती. 

Pune : पुण्यात लष्कराच्या मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील  लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हिमाचल प्रदेश मधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑफिसर) गुन्हा दाखल केला आहे. अजित मिलू असं गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. 43 वर्षीय महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केली होती. 

लष्कराच्या मिलिटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूल येथे महिला अधिकारी आल्या होत्या. त्यांची जयपूर येथे पोस्टिंग होती. त्यांचे पती देखील लष्करात अधिकारी आहेत. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्या आल्या होत्या. तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होत्या. निवासी खोलीत राहत असताना बुधवारी सकाळी त्यांनी खोलीतच गळफास घेतल्याचे आढळून आलं होतं. यामुळे खळबळ उडाली होती.

या प्रकरणी पूणे पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. त्याचा तपास सुरू होता. दरम्यान, ब्रिगेडियरवर अजित मिलू यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान अजित हे हिमाचल प्रदेश येथे आर्मी ट्रेनिंग सेंटरच्या हेडकॉर्टर येथे सुपिरियर आर्मी ऑफिसर (ब्रिगेडियर) या पदावर आहेत. त्यांनी महिला अधिकारी एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकी देत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास  करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Embed widget