रुग्णालयातील महिलांच्या तपासणीचे 'व्हिडीओंची विक्री; गुजरात पोलिसांची कारवाई, शिराळातील तरूणाला अटक
Shirala Crime News: गुजरातमधील राजकोटच्या महिला रुग्णालयातील प्रसूतिगृहात जाणाऱ्या महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी शिराळा तालुक्यातील एका तरुणाला अटक करण्यात आलीय.

Shirala Crime News: गुजरातमधील (Gujarat) राजकोटच्या महिला रुग्णालयातील प्रसूतिगृहात जाणाऱ्या महिलांच्या वैद्यकीय तपासणीचे व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी शिराळा तालुक्यातील चिखली येथील एका तरुणाला अटक (Shirala Crime News) करण्यात आली आहे. प्राज राजेंद्र पाटील (वय 20 वर्ष) असे या युवकास गुजरात आणि शिराळा पोलिसांनी मिळून अटक केलीय. तसेच प्रज्ज्वल तेली आणि प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील चंद्रप्रकाश फुलचंद या दोघांनाही अटक करण्यात आलीय.
तीन वर्षांपासून लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी, दरम्यान कल्पना सुचली
पुढे आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील 'सीसीटीव्ही' यंत्रणा हॅक करून 'टेलिग्राम' सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'व्हिडिओ' विकल्याप्रकरणी अहमदाबाद (गुजरात) पोलिसांनी कारवाई केली आहे. प्राज पाटील यास 19 फेब्रुवारीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात प्रज्ज्वल तेली हा मास्टरमाइंड आहे. प्राज पाटील हा तीन वर्षांपासून लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करत होता. त्यावेळी त्यांना अश्लील व्हिडिओ विकण्याची कल्पना सुचली. या दोघांनी इंटरनेटवर दोन ते चार हजार रुपयांना विकण्यासाठी महिलांचे व्हिडीओ मिळविले. राजकोट रुग्णालयातील महिलांच्या गोपनीयतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर अहमदाबाद सायबर गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. यामध्ये तेलीने एका वर्षाहून अधिक काळ टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'व्हिडीओ' वितरित केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्यांकडून अफूची शेती, तिघांविरोधात गुन्हा दाखल
इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात खसखसची म्हणजेच अफूची शेती करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी समूह पद्धतीने आपल्या शेतामध्ये ही लागवडीस बंदी असलेली खसखस म्हणजेच अफू लावलेली होती. गोपनीय बातमीदारांपतमार्फत याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर वालचंद नगर पोलिस आणि एलसीबीच्या पथकाने संयुक्तिक ही कारवाई केली आहे. न्हावी गावाचे शिवारात मक्याच्या पिकात ही अफूची शेती केली होती.
पोलिसांनी कारवाई करत एकूण 27 लाख 56 हजार 460 रूपये किंमतीची सुमारे 883 किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करून तीन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. रतन मारकड, बाळू जाधव आणि कल्याण जाधव अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन मध्ये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम नुसार गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

