Beed Crime : बिझनेस पार्टनरलाच लुटलं, माजी सरपंचाला मारहाण करत पायाला कुलूप लावून डांबले, बीडमधील खळबळजनक घटना
Beed Crime : व्यवसायात भागिदार असलेल्या माजी सरपंचाला लुटून त्याला डांबून ठेवल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात घडलाय.
Beed Crime : व्यवसायात भागिदार असलेल्या माजी सरपंचाला लुटून त्याला डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडलाय. भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आलय. याशिवाय लुटल्यानंतर माजी सरपंचाच्या पायाला कुलूप लावून डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान, डांबून ठेवलेल्या पीडित व्यक्तीने स्वत:ची सुटका करत थेट पोलीस ठाणे गाठलंय. याबाबत पोलिसांनी संबंधित पीडित व्यक्तीसोबत झालेला प्रकार ऐकून घेतलाय.
ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांमध्ये भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय
अधिकची माहिती अशी की, बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आलय. ज्ञानेश्वर इंगळे आणि दत्ता तांदळे या दोघांमध्ये भागीदारीत मसाल्याचा व्यवसाय आहे. आणि हाच व्यवसाय वाढीसाठी हे दोघेजण मुंबईला 31 डिसेंबर रोजी निघाले होते. मात्र दत्ता तांदळे याने सोबतच्या ज्ञानेश्वर इंगळे याला डांबून ठेवून जवळील एक लाखाहून अधिकची रक्कम लुटली. केवळ एवढ्यावरच नाही तर ज्ञानेश्वर इंगळे याच्या पायाला कुलूप लावून डांबण्यात आलं. संधी शोधून ज्ञानेश्वरी इंगळे याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. आता याच प्रकरणात पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दत्ता तांदळे हा देखील पाटोदा येथील पोलीस ठाण्यात तक्रार देतोय. मात्र थेट पायाला कुलूप लावून आलेल्या या सर्व प्रकाराची सध्या चर्चा होऊ लागली आहे.
दोन लाख सात हजार रुपये आणि माझा मोबाईल काढून घेतला - ज्ञानेश्वर इंगळे
पीडित माजी सरपंच ज्ञानेश्वर इंगळे म्हणाले, मी गावचा माजी सरंपच आहे. आमचा वीस लाखांचा व्यवहार होता. केजच्या कळंब चौकातून माझं पहाटे पाच वाजता अपहरण करण्यात आलं. मी दोन लाख सात हजार रुपये आणले होते ते माझ्याकडून काढून घेण्यात आले. याशिवाय माझा मोबाईल माझ्याकडून काढून घेण्यात आला. मला त्यांनी पाटोद्याला एका रुममध्ये बांधून ठेवण्यात आलं. मला कुलूप लावून बांधून ठेवण्यात आलं होतं. मात्र, मी आदळून आदळून पट्टी तोडली आणि तेथून बाहेर पडलो.
इतर महत्त्वाच्या बातम्या