Santosh Deshmukh Murder Case : कृष्णा आंधळे 2023 मधील 307 च्या गुन्ह्यात फरार, तरीही बिनधास्त फिरायचा; देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून धक्कादायक माहिती समोर
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीवर 2023 मध्ये 307 चा गुन्हा दाखल होता.
Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आणखी मोठे खुलासे झाले आहेत. राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात सुरुवात झाल्यानंतर सीआयडीकडून तपासाला वेग आलाय. सीआयडीच्या तपासात अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. विशेष म्हणजे सरपंच खून प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे ( Krishna Andhale) हा यापूर्वी 2023 मध्ये हत्येचा प्रयत्नात म्हणजे 307 च्या गुन्ह्यात फरार आहे. मग प्रश्न असा उपस्थित होतो की फरार आरोपी बिनधास्त कसा फिरत होत? त्याने हा दुसरा खून (संतोष देशमुखांचा) केला आहे.
सुदर्शन घुलेवर यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल होता
सीआयडी तपासात अनेक गोष्टींचे खुलासे झाले आहेत. सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर यापूर्वी 307 चा गुन्हा दाखल होता. कृष्णा आंधळे 2023 मध्ये 307 दाखल होता, तेव्हापासून आंधळे फरार आहे...धारूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे. दरम्यान आता सीआयडीकडून अटक असलेल्या आरोपींचा जबाब घेतली जात आहेत. आरोपींचे बँक खाते गोठवण्यात आले आहेत, यासाठी आतापर्यंत 13 ते 15 बँकेला पत्र दिले आहे.....यामध्ये सर्वाधक परळीमधील बँकांचा समावेश आहे.
घुले याच्या संबंधित 3 लोकांची आज चौकशी करण्यात आली
कृष्णा शामराव आंधळे सरपंच खून प्रकरणातील आरोपी 2023 मध्ये 307 (खुनाचा प्रयत्न)मध्ये अटक झाला नाही. त्यावेळी ही त्याला अटक नाही. धारूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. म्हणजे त्याला अटक झाली नाही हे विशेष आहे... आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याची तारीख 13 जानेवारी आहे. विमानानं प्रवास करू नये म्हणून देशभरातील सगळ्या विमानळाला फोटो दिला होता. आज पर्यंत 130 लोकांची चौकशी करण्यात आली आहे. मुख्य आरोपी घुले याच्या संबंधित 3 लोकांची आज चौकशी करण्यात आली.
वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी गोवा, कर्नाटक, पुणे असा फिरला होता.... कराडला पकडण्यासाठी देश भरातील सर्वविमानतळावर कराड आणि आरोपींचे फोटो देण्यात आले होते.....वाल्मिक कराडची दिवसभर चौकशी सुरू आहे.....आज तीन लोकांची चौकशी करण्यात आली आहे. सीआयडीने आतापर्यंत या प्रकरणात एक जवळपास 130 लोकांची चौकशी केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या