Accident News: नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावर असलेल्या PSI चा अपघाती मृत्यू; पिंपरी चिंचवडमधील घटना, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Pimpri Chinchwad Accident: नववर्षाच्या स्वागतावेळी कोणती दुर्घटना घडू नये म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
पुणे: नववर्षाचा एकीकडे उत्साह, जल्लोष दिसून येत असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये एका अपघातामुळे (Accident) हळहळ व्यक्त होत आहे. पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावरती असतानाच अपघाती (Accident) मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जितेंद्र गिरनार असं त्यांचं नाव असून ते कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. (Accident)
नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून पीएसआय गिरनार हे चाकण एमआयडीसीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरुन ते कारमधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता, मात्र, कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. या घटनेमध्ये गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे. या घटनेने गिरनार यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.(Accident)