Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, एफएमसीजी शेअर्समध्ये वाढ कायम
Stock Market : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 463 अंकांच्या वाढीसह 52,729 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 145 अंकांच्या वाढीसह 15,702 अंकांवर बंद झाला.
Stock Market : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे आणि जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आज व्यवहार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 52,729 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 145 अंकांच्या वाढीसह 15,702 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात आज आयटी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रांत खरेदी दिसून आली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, ग्राहकोपयोगी ऊर्जा आणि तेल आणि वायू क्षेत्रात खरेदी दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही वाढ झाली आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 41 शेअर्स वाढीसह बंद झाले. तर नऊ शेअर्समध्ये घसरण झाली आहे. सेन्सेक्समधील 30 शेअसर्सपैकी सहा शेअर घसरले.
वाढलेले शेअर्स
वाढत्या शेअसर्समध्ये महिंद्रा 4.24 टक्के, इंडसइंड बँक 2.46 टक्के, बजाज फायनान्स 2.43 टक्के, एचयूएल 2.37 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.07 टक्के, भारती एअरटेल 1.59 टक्के, टाटा स्टील 1.43 टक्के, नेस्ले 1.32 टक्के, एचडीएफसी बँक 1.32 टक्के, रिलायन्स बँक 2.07 टक्के. 1.25 टक्के वाढ झाली.
घसरलेले शेअसर्स
टेक महिंद्रा 1.04 टक्के, इन्फोसिस 0.78 टक्के, टीसीएस 0.36 टक्के, एचसीएल टेक 0.36 टक्के, विप्रो 0.13 टक्के, सन फार्मा 0.05 टक्के घसरणीसह बंद झाले आहेत.
सुरूवातीला उसळी
आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात वाढीने झाली होती. काल दुसऱ्या सत्रात बाजारात तेजी होती, ती आजही कायम राहिली. निफ्टीमधील धातू, बँक आणि वाहन समभागांच्या अष्टपैलू तेजीमुळे बाजाराने वरच्या श्रेणीत व्यवहार केला. बाजाराच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत सेन्सेक्सने 500 हून अधिक अंकांची वाढ करून 52800 ची पातळी ओलांडली होती. सेन्सेक्स 536.99 अंकांच्या किंवा 1.03 टक्क्यांच्या वाढीसह 52,802.71 वर व्यवहार करत होता. निफ्टी 50 158.90 अंकांच्या म्हणजेच 1.02 टक्क्यांच्या उसळीसह 15,715.55 वर व्यवहार करत होता. परंतु, आज व्यवहार बंद होताना थोड्याशा घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 463 अंकांच्या वाढीसह 52,729 अंकांवर बंद झाला.