एक्स्प्लोर

12,000 कोटींची संपत्ती, 6500 कर्मचारी; अब्जावधींचं साम्राज्य, उद्योजकाच्या मुलानं केली 200 रुपये पगारावर नोकरी

अब्जावधी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या उद्योजकाची यशोगाथा आपण पाहणार आहोत. या उद्योजकाने व्यवसायातील युक्त्या शिकण्यासाठी आपल्या मुलाला छोटी-मोठी नोकरी करण्यास सांगितले होते.

Success Story: जगात असे अनेक श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या मुलांना मोठा व्यवसाय आणि पैसा वारसाने मिळतो. पण, असे काही वडील आहेत जे आपल्या मुलांना व्यवसाय सोपवण्यापूर्वी त्यांना संघर्ष आणि यशाचा मार्ग समजावून सांगतात. आज आम्ही तुम्हाला सूरतमधील एका प्रसिद्ध हिरे व्यावसायिकाच्या यशोगाथेबद्दल माहिती सांगणार आहोत. ज्याने आपल्या मेहनतीने करोडो आणि अब्जावधी रुपयांचे व्यवसायाचे साम्राज्य निर्माण केले आहे. पण, व्यवसायातील युक्त्या शिकण्यासाठी आपल्या मुलाला छोटी-मोठी नोकरी करण्यास सांगितले. सावजी धनजी ढोलकिया असं या उद्योजकाचं नाव आहे.  

एक उदार उद्योजक म्हणून

सावजी धनजी ढोलकिया यांना गुजरातमधील सुरत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं जातं. ते देशातील आघाडीचे हिरे व्यापारी आहेत. हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संस्थापक आणि अध्यक्ष सावजी धनजी ढोलकिया हे एक उदार उद्योजक म्हणूनही ओळखले जातात. कारण दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार आणि फ्लॅटसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.

अफाट संपत्ती पण मुलाला नोकरी करायला सांगितलं

1992 मध्ये सावजी धनजी यांनी त्यांच्या 3 भावांसह सुरतमध्ये हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. तेव्हापासून कंपनीचा विस्तार सुरूच आहे. 6500 कर्मचार्‍यांसह, हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड हे हिरे व्यवसायात अग्रगण्य नाव बनले आहे. अफाट संपत्ती आणि प्रसिद्धी मिळूनही सावजी धनजी ढोलकिया हे नम्र व्यक्ती असल्याचे म्हटले जाते. आपल्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी घेणाऱ्या सावजींनी आपल्या मुलाला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगितले.

बेकरीमध्ये दिवसाला 200 रुपये पगारावर नोकरी

सावजी धनजींनी आपला मुलगा द्रव्याला कुटुंबाचे नाव आणि ओळख न वापरता स्वतंत्रपणे काम करण्यास प्रोत्साहित केले. वडिलांच्या सल्ल्यानुसार, द्रव्याने चपलांचे दुकान, मॅकडोनाल्ड आणि कॉल सेंटरसह विविध नोकऱ्या केल्या. आर्थिक संघर्षाचा सामना करत द्राव्याने जीवनातील सर्वात मौल्यवान धडे शिकले. वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असूनही, द्रव्या एका बेकरीमध्ये दिवसाला 200 रुपये पगारावर काम करत होता.

दरवर्षी कर्मचार्‍यांना महागड्या भेटवस्तू वितरित 

सावजी धनजींनी आपल्या मुलाला जीवनातील युक्त्या शिकण्यासाठी कठोर परिश्रम करण्यास सांगितले असले तरी मात्र, ते कर्मचार्‍यांसाठी नेहमीच उदार होते. ते त्यांच्या कर्मचार्‍यांना देत असलेल्या दिवाळी बोनससाठी ओळखले जातात. बोनस म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांना दागिने, कार आणि फ्लॅट यांसारख्या भव्य भेटवस्तू दिल्या. ऑक्टोबर 2018 मध्ये, त्याने पात्र कर्मचाऱ्यांना 600 कार भेट देऊन चर्चेत आणले. डीएनए रिपोर्टनुसार सावजी धनजी ढोलकिया यांची एकूण संपत्ती 12,000 कोटी रुपये आहे.

यापूर्वी 2016 मध्ये सावजी धनजी यांनी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 400 फ्लॅट आणि 1,260 कार भेट दिल्या होत्या. अशा बोनसमागील त्याच्या प्रेरणांबद्दल विचारले असता, ते म्हणाले की प्रत्येकाचे स्वतःचे घर आणि कार असण्याचे स्वप्न असते. म्हणून मी फक्त माझ्या कर्मचाऱ्यांना हे स्वप्न साकार करण्यास मदत करतो.

महत्त्वाच्या बातम्या:

पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
चार मतदारसंघात लाडक्या बहिणी निर्णायक ठरणार, कागलमध्ये तगडी फाईट; कोल्हापूर जिल्ह्यात मतदानाची उत्सुकता शिगेला
Sanjay Raut : राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
राज ठाकरेंनी 25 वर्षात काय केलं? उद्धव ठाकरेंचा पक्ष पुढे गेला, संजय राऊतांचा पलटवार; म्हणाले, आम्हाला त्यांचं वाईट वाटतं!
रात्रीस खेळ चाले...! नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी पकडला प्रेशर कुकरचा ट्रक
नोटांची बंडलं, दारु, सोनं-चांदी सगळं झालं आता पुण्यात मतदानाच्या आदल्या दिवशी प्रेशर कुकरचा ट्रक पकडला
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
तुमचा आशीर्वाद माझा पारड्यात टाकून तुमच्या पदरात घ्यावं..! रोहित आर. आर. पाटलांची भावनिक साद
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Embed widget