एक्स्प्लोर

सांगोल्याचं डाळिंब निघालं अमेरिकेला, समुद्रामार्गे 4200 पेट्यांची निर्यात 

Export of Pomegranate : भारताने डाळींबाची (Pomegranate) पहिली प्रायोगिक तत्वावरील व्यावसायिक खेप  समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला (USA) रवाना केली आहे

Export of Pomegranate : भारताने डाळींबाची (Pomegranate) पहिली प्रायोगिक तत्वावरील व्यावसायिक खेप  समुद्रमार्गे यशस्वीरित्या अमेरिकेला (USA) रवाना केली आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) माध्यमातून वाशी (नवी मुंबई) येथील आयएनआय फार्म्सद्वारे ही खेप पाठवण्यात आली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल आणि अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी डाळिंबाच्या 4200 पेट्यांच्या (12.6 टन) खेपेला हिरवा झेंडा दाखवला.

महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळ (एमएसएएमबी), प्रादेशिक वनस्पती विलगीकरण केंद्र (आरपीक्यूएस-एमओए आणि एफडब्ल्यू), राज्य कृषी विभाग (महाराष्ट्र सरकार), एनआरसी डाळिंब, अमेरिकन वाणिज्य दूतावास आणि आयएनआय फार्म्सचे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. अपेडाने गेल्या वर्षी तांत्रिक भागीदार म्हणून आयसीएआर-एनआरसी डाळिंब सोलापूरच्या सहकार्याने किरणोत्सर्ग प्रक्रिया आणि स्थिर चाचणीसह डाळिंबाची हवाई खेप  यशस्वीरित्या पाठवली होती. या यशस्वी प्रयोगानंतर, अपेडाने भारतीय डाळिंबाच्या संभाव्य बाजारपेठेसाठी सागरी व्यापार संबंधाच्या माध्यमातून डाळींब पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

भारत जगातील सर्वात मोठ्या डाळींब उत्पादकांपैकी एक

भारत जगातील सर्वात मोठ्या डाळींब उत्पादकांपैकी एक आहे. आता जगातील डाळिंब निर्यातीत आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक होण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. युरोपीय महासंघ, आखाती देश आणि आशियाई बाजारपेठांमध्ये वाढत असलेला भारत हा एक प्रमुख देश आहे. अपेडा नोंदणीकृत आयएनआय फार्म्सने या प्रायोगिक हवाई खेप, सागरी खेप आणि सागरी कंटेनरचे कार्यान्वयन केले आहे. ही कंपनी भारतातील फळे आणि भाज्यांचे सर्वोच्च निर्यातदार असून त्यांची उत्पादने जगभरातील 25 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत. या कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक बाजारपेठेतील कठोर मानकांची पूर्तता करण्यासाठी, डाळिंबाची गुणवत्ता आणि साठवण वाढवण्याकरता व्यापक प्रयत्न केले आहेत. एग्रोस्टार समूहाचा एक भाग म्हणून, आयएनआय फार्म्सने महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत थेट काम करून डाळिंबासाठी मूल्य साखळी स्थापन केली आहे.

केशरी डाळिंब हे जगभरातील सर्वोत्तम जातींपैकी एक

महाराष्ट्रातील सांगोला येथील अनार्नेट नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून ही डाळिंब घेतली आहेत. इतर निर्यात बाजारांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा हप्ता 20 टक्के आणि देशांतर्गत बाजारपेठेच्या तुलनेत 35 टक्के होता, हे लक्षणीय आहे. डाळिंब हे भारताचे एक महत्त्वाचे कृषी-उत्पादन आहे, फळांशी संबंधित समृद्ध इतिहास आणि त्याचे पोषणमूल्य त्याच्या लोकप्रिय मागणीमध्ये योगदान देते. मऊ मांसल बिया, कमी आम्लता आणि आकर्षक रंगासह गुणवत्तेच्या दृष्टीने डाळिंबाच्या काही सर्वोत्तम जातींचे उत्पादन भारत करतो. केशरी डाळिंब हे जगभरातील सर्वोत्तम जातींपैकी एक मानले जाते. गेल्या दशकात भारताने डाळिंबाचे क्षेत्रफळ तसेच उत्पादन वाढवले आहे, निर्यातीत वाढ झाली आहे. डाळिंबाच्या बाजारपेठेत, उत्तम दर्जाच्या उत्पादनासाठी प्रशिक्षित शेतकऱ्यांसह वर्षभर डाळिंबाचा पुरवठा करण्यास सक्षम असण्याचा भारताला महत्त्वपूर्ण फायदा होतो. नजीकच्या वर्षांत डाळिंबाचे उत्पादन 20-25 टक्क्यांच्या दराने वाढत आहे. भारतात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही डाळिंब उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे.

भारतातून या देशांना डाळिंबाची निर्यात

अपेडाने 2022-23 मध्ये संयुक्त अरब अमिराती (यू. ए. ई.), बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, थायलंड, बहरीन आणि ओमानला 58.36 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स किमतीच्या डाळिंबाची निर्यात केली आहे. डाळिंबाच्या निर्यातीसाठी पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्याकरिता अपेडा सक्रियपणे काम करत आहे. डाळिंबासाठी निर्यात प्रोत्साहन मंच (ईपीएफ) स्थापन करणे हे डाळिंबाच्या निर्यातीला चालना देणारे आहे. ईईपीएफ मध्ये वाणिज्य विभाग, कृषी विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा आणि उत्पादनाच्या दहा आघाडीच्या निर्यातदारांचे प्रतिनिधी आहेत. समुद्रमार्गे खेप पाठवण्यासाठी अपेडाने घेतलेल्या पुढाकारामुळं भारतीय निर्यातदार आणि परदेशी आयातदार यांच्यात गुणवत्ता हमीबाबत विश्वास निर्माण होईल.

महत्वाच्या बातम्या:

Success Story : ऊसाच्या बालेकिल्ल्यात 'डाळिंब किंग', युवा शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग; दोन एकरात लाखोंचा नफा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Shendge : Chhagan bhujbal यांना डावलून  Manoj Jarange यांची इच्छापूर्ती कली : प्रकाश शेंडगेDevendra Fadnavis vs Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार-देवेंद्र फडणवीसांची चर्चा, नाराजी दूर?Bajrang Sonawane : Santosh Deshmukh हत्या प्रकरण संसदेत गाजलं, बजरंग सोनावणेंची मोठी मागणीSudhir Mungantiwar : मंत्रिपद कापलं, सुधीर मुनगंटीवार म्हणाले; आता विषय संपला, पुढे मी...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले, छगन भुजबळ समर्थक आक्रमक, दोन दिवसात समर्थकांचा मेळावा
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
फडणवीस म्हणाले, 20 हजारांची लीड द्या, मंत्रिपद देतो; पण, 50 हजारांचं मताधिक्य देऊनही आमदाराला मिळाला डच्चू
Tanaji Sawant: तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
तानाजी सावंतांनी फेसबुकचा डीपी बदलला, शिवसेना नाव अन् चिन्हच हटवलं; नव्या पिक्चरवर कोण?
Fact Check : शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
शशी थरुर यांच्या पायाला दुखापत झाल्याचा फोटो व्हायरल, वेगवेगळ्या दाव्यांचं सत्य अखेर समोर
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचे पथक मस्साजोगमध्ये दाखल; पीडित कुटुंबियांची घेतली भेट
भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 
मुकेश अंबानी अन् गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, सर्वात श्रीमंत कुटुंब कोणतं?
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Video: बीडमधील सरपंच देशमुख हत्याप्रकरणाचा मुद्दा तापला; सकाळी विधीमंडळात, दुपारी थेट दिल्लीच्या संसदेत
Ladki Bahin Yojana : पुरवणी मागण्यांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
विधानसभेत लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
Embed widget