एक्स्प्लोर

Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?

Budget 2025 : केंद्र सरकार आगामी काळात मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा निर्णय घेऊ शकतं. प्राप्तिकर दरात बदलाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला सादर करतील. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची उद्योजकांसोबत देखील बैठक झाली आहे. आगामी अर्थसंकल्पासंदर्भात काही अंदाज व्यक्त केले जात आहेत. अर्थसंकल्प सादर करताना प्राप्तिकर आकारणी संदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आर्थिक वर्षात 15 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर दराच्या कपातीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार  या निर्णयानं मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढू शकते. त्यामुळं अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळू शकते, असा अंदाज आहे. 

या निर्णयाचा फायदा कोट्यवधी प्राप्तिकरदात्यांना होऊ शकतो. सध्या जीवनमानाचा स्तर उंचावल्यानं आर्थिक बोजा पडताना पाहायला मिळतो. जे करदाते 2020 च्या कररचेनचा स्वीकार करतात त्यांना घरभाडे भत्ता सारख्या इतर भत्त्यांचा लाभ मिळत नाही. नव्या कररचनेत  3 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के ते 20 टक्के कर लागतो. तर, उच्च उत्पन्न गटावर 30 टक्क्यांपर्यंत कर लागतो. 

भारतातील करदात्यांना जुनी करप्रणाली आणि नवी करप्रणाली यापैकी एकाची निवड करावी लागते. जुन्या करप्रणालीत करदात्यांना घरभाडे भत्ता, विमा क्षेत्रातील गुंतवणुकीवर सूट मिळते. मात्र, 2020 च्या नव्या करप्रणालीत कोणत्याही प्रकारची सूट मिळत नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की  कपात किती प्रकारची होईल हे निश्चित नाही मात्र अर्थसंकल्पापूर्वी याबाबतचा निर्णय होऊ शकतो. अर्थमंत्रालयानं यासंदर्भात कोणतंही भाष्य सध्या केलेलं नाही. कोणतीही कर कपात करुन महसूल गमावण्याचा विचार केला जाणार नाही मात्र कराचे दर असे असतील की ज्यामुळं नव्या कर प्रणालीची निवड करदाते करतील, असं देखील सूत्रांनी म्हटलं. भारतात सध्या ज्या नागरिकांचं उत्पन्न 1 कोटी रुपये असतं त्यांना 30 टक्के कर द्यावा लागतो. 

करकपातीचा निर्णय झाल्यास मध्यमवर्गाच्या हातात पैसे राहतील. त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आहे. मात्र, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग काहीसा मंदावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या सात तिमाहीत वेग मंदावल्याचं दिसून आलं. खाद्यपदार्थ क्षेत्रातील महागाई वाढल्यानं त्याचा इतर क्षेत्रांवर देखील परिणाम झाला आहे. याशिवाय मध्यमवर्गावरील अधिक करामुळं सरकारला टीकेचा सामना देखील करावा लागतो. 

इतर बातम्या :

IPO Update : शेअर बाजारात 6 आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी, कोणता IPO सर्वाधिक रिटर्न देणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget