एक्स्प्लोर
Advertisement
विश्वविक्रम : युट्यूबवर 600 कोटी व्ह्यूव्ज मिळवणारं पहिलं गाणं
आज रात्री किंवा उद्या दिवसअखेर पर्यंत 'डेस्पसितो' या गाण्याचा युट्यूबवरचा 6 अब्ज (600 कोटी) व्ह्यू काऊंटचा टप्पा पार होईल. हा आजवरचा उच्चांक आहे.
आज रात्री किंवा उद्या दिवसअखेर पर्यंत 'डेस्पसितो' या गाण्याचा युट्यूबवरचा 6 अब्ज (600 कोटी) व्ह्यूव्ज काऊंटचा टप्पा पार होईल. हा आजवरचा उच्चांक आहे. जवळपास पृथ्वीवरील मानवी लोकसंख्येइतकी ही व्ह्यूअर्सची संख्या आहे. हा टप्पा आजवर कोणत्याच गीताला गाठता आला नाही. 20 जून 2017 ला 'डेस्पसितो' यु ट्यूबवर रिलीज झाले. अवघ्या वीस महिन्यात या व्हिडीओने हा आकडा गाठला आहे. मूळ गाणं 12 जानेवारी 2017 ला रिलीज झालं. जस्टिन बीबरने त्याचं रिमिक्स एप्रिल 2017 मध्ये केलं. मे 2017 मध्ये ते युट्युबवर येताच हंगामा झाला आणि पुढे जाऊन 'डेस्पसितो'ने इतिहास घडवला.
अब्ज व्ह्यूव्ज काऊंटलिस्टमध्ये पुष्कळ गाणी आहेत.
एड शिरनच्या 'शेप ऑफ यू' या गाण्याने नुकताच चार अब्जचा (400 कोटी) टप्पा पार केलाय. त्यासाठी या गीतालाही वीस महिने लागले. त्याच्याच 'थिंकींग आऊट लाऊड'ला 2.5 अब्जचा (250 कोटी) टप्पा गाठता आला आहे.
22 ऑक्टोबर 2015 ला युट्युबवर दाखल झालेल्या जस्टीन बिबरच्या 'सॉरी'ला आता कुठे तीन अब्जचा (300 कोटी) टप्पा गाठता आलाय.
ऍडेलच्या 'हॅलो' ला अडीच अब्जपर्यंत (250 कोटी) जाता आले आहे.
फिफ्थ हार्मनीचे 'वर्क फ्रॉम होम' (अडीच अब्ज), मेजर लीझर आणि डीजे स्नेक यांच्या इको ग्राफिक 'लीन ऑन'लाही अडीच अब्जला (250 कोटी) टच करता आलं आहे. याच्या व्हिडीओमध्ये साडी परिधान केलेल्या काही भारतीय तर काही एनआरआय मुली होत्या !
केटी पेरीच्या 'डार्क हॉर्सने अडीच अब्ज (250 कोटी) क्रॉस केलेत.
चेनस्मोकर्सचे 'क्लोजर' हे अप्रतिम देखणं शूट झालेलं गाणं. यानेही 2.25 अब्जचा (225 कोटी)टप्पा गाठला आहे.
ऍलन वॉकरच्या 'फेडेड' या गीताने 2.25 अब्जचा (225 कोटी) टप्पा गाठला आहे.
पॅसेंजरच्या साध्यासुध्या शांत अशा 'लेट हर गो'ने 2.25 अब्जचा(225 कोटी) टप्पा पार केला आहे.
सेलेना गोम्झ घेऊन केलेल्या 'वुई डोन्ट टॉक एनीमोअर' या चार्ली प्युटच्या गीताने दोन अब्जला (200 कोटी) क्रॉस केलं आहे.
मरून फाईव्ह ग्रुपच्या 'गर्ल्स लाईक यू'ने नऊ महिन्यात दोन अब्जपर्यंत (200 कोटी) झेप घेतली आहे. यांचेच 'शुगर' आता तीन अब्ज गाठेल.
क्लीन बँडीटच्या 'रॉक-अ-बाय' या करेबियन टच असलेल्या गीताने दोन अब्जच्या फिगरला टच केलं आहे.
शकिराचं WAKA WAKA दोन अब्ज, Chantaje (चंटाये) सव्वादोन अब्ज आणि एन्रीके ईग्लेशियसचं 'बायलँडो' - अडीच अब्ज ही देखील हिट गाणी होत.
जी बाल्विन आणि विली विल्यम यांच्या 'मी जेन्टेल'ने आश्चर्यकारक रित्या अडीच अब्जला गाठलंय.
काही काळाआधी जग गाजवणारया 'गंगनम स्टाईल'ने चक्क सव्वातीन अब्जचा टप्पा गाठलाय.
विझ खलिफाचं 'सी यु अगेन' हे सायलेंट रॅप फ्युजन सॉन्ग चार अब्जच्या पार गेलंय.
टेलर स्विफ्टचं 'ब्लँक स्पेस' आता अडीच अब्जचा टप्पा गाठेल.
केल्विन हॅरिस आणि रिहानाच्या 'धिस इज व्हॉट यु केम फॉर'ने दोन अब्जला पार केलंय.
एक अब्ज ते दोन अब्जच्या दरम्यान अनेक गाणी आहेत, त्या मानाने दोन अब्ज ते तीन अब्ज व्ह्यू काऊंटची गाणी कमी आहेत.
सीया, शॉन पॉल यांच्या 'चीप थ्रिल'ला एक अब्जचा टप्पा गाठता आला आहे
अनेक दिग्गज नावं एक अब्जच्या खाली आहेत याचा अर्थ ते लोकप्रिय नव्हते असं नव्हे तर त्यांच्या काळात ही साधने नव्हती अन्यथा त्यांनी या सगळ्या उच्चांकाचा कधीच पालापाचोळा केला असता.
या दशकांत लोकप्रिय झालेल्या गीतात लॅटिन अमेरिकन गीतसंगीताची छाप अधिक ठळक झालीय असा निष्कर्ष ही काढता येईल. जोडीला मध्यपूर्वेतील गाण्यांनाही जागतिक लोकप्रियता लाभते आहे हे नमूद करावेसे वाटते. तुलनेत युरोप आणि अमेरिकन वर्चस्व खूप कमी झालेय. आफ्रिकन देशही पुढे जाताहेत. भारतीय संगीताची एकच बोलीभाषा नसल्याने आणि तुलनेत त्याचं मार्केटिंग खूपच नगण्य असल्याने अजून मागे आहे. बॉलिवूडचा एकच साचेबंद शिक्का पाश्च्यात्त्य जगताने डोक्यात ठेवल्याने अजूनच नुकसान होते आहे. ठराविक गायकांची आणि म्युझिक हाऊसची मक्तेदारी मोडून काढल्याशिवाय आपल्याकडे 'डेस्पसितो' घडणार नाही. खरं तर त्या तोडीचं टॅलेंट खूप आहे पण वेगवेगळ्या ग्रुपिझमचा शाप आपल्या इथं या ही क्षेत्राला लागलेला आहे.
लुईस फॉन्सी आणि डॅडी यान्की या जोडगोळीचं ''डेस्पसितो'साठी अभिनंदन. या गीताला असलेला वाढत जाणारा टेम्पो श्रोत्याला आपल्या विश्वात घेऊन जातो. थिरकायला भाग पाडतो. यातले बीट्स ठेका धरायला लावणारे आहेत. डान्स स्टेप्स देखील खूप किचकट नाहीत. विशेष म्हणजे अबालवृद्धांनी याचा आनंद घेतलाय. ''डेस्पसितो'हा स्पॅनिश शब्द आहे, despacio पासून तो तयार झालाय. 'सावकाश' असा त्याचा सरधोपट अर्थ होईल. संथ गतीने हे गाणं सुरु होतं आणि शेवटी फास्ट ड्रम्समध्ये फिनिश होतं. गाण्यातली लय मादक आहे. झिंग आणणारा ऱ्हिदम हा याचा प्राण ठरावा. या गाण्याची जगभरातील अनेक भाषेतली व्हर्जन्स आहेत. मराठी ढोलपथकाने देखील एक व्हर्जन केलं आहे. श्यामक दावरचं इंडियन डान्स व्हर्जन मस्त आहे. तामिळ तेलुगु व्हर्जन्स अधिक परफेक्ट झालीत. 'डेस्पसितो'ची वेगवेगळी इंस्तट्रूमेंटल व्हर्जन्स माईण्ड ब्लोइंग आहेत. ''डेस्पसितो'च्या सर्व व्हर्जन्सचा व्ह्यू काऊंट एकत्र केला तर तो दहा अब्जहुन अधिक होईल. अशी लोकप्रियता क्वचित लाभते. यात लुईस फॉन्सी आणि डॅडी यान्की लकी ठरलेत. आपल्याकडील एखाद्या गीताला असा टप्पा गाठणं शक्य होईल तेंव्हा आपलं संगीत ही जगभर पसरलेलं असेल.
जातधर्म, देश, भाषा, प्रांत, वर्ण, लिंग, वय या सर्व बॅरियर्सना मोडून काढून लोक वेगवेगळ्या भाषेतलं गीत संगीत ऐकतात तेंव्हा संगीतातील ताकद अधोरेखित होते. संगीताला कोणत्याच सीमा कधीच बांधून ठेवू शकत नाहीत हे कोणत्याही राज्यकर्त्याने नक्की ध्यानी ठेवावं कारण संगीत हा ज्याचा आत्मा असतो त्याला कोणतीच बंधनं अडवू शकत नाहीत. किंबहुना मानवी संस्कृतीचा आदिम हिस्सा असलेलं संगीत मानवतेचं प्रतिक मानलं जाईल तेंव्हा द्वेष, विखार, हेट कल्चर बऱ्यापैकी मोडीत निघेल...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
विश्व
राजकारण
रत्नागिरी
Advertisement