Blog : 'X' फॅक्टर...
Blog On Twitter X : इलॉन मस्कच्या कुरापती काही थांबता थांबतच नाहीयेत, हा बाबा एवढ्या कुरापती करतोय की आता प्रत्येक जण म्हणतोय इलॉनला काय झालंय तरी काय?
एकेकाळी 21 मार्च 2006, कॅलिफोर्निया मध्ये ट्विटर ची चिमणी जन्माला आली. तेव्हा पासून आजतागायत ट्विटर ला सोशल मीडियाचा राजा म्हणून पाहिलं जायचं...
ट्विटर इलॉन मस्क ने विकत घेतलं आणि बट्ट्याबोळ सुरू झाला... कित्येक राडे मस्क ने घालून ठेवले, आणि त्यातच आता ट्विटर चा लोगोच नाही तर त्याच्या डोमेन मध्येही बदल पाहायला मिळत आहे..
रॉकेट प्रोजेक्ट Space X, Star Link असो किंवा Chat GPT ला टक्कर देणारं X AI इतकंच काय तर इलोन ने स्वतःच्या मुलांचं नाव देखील X वरूनच ठेवलंय 'X A12'. असलं भलतच नाव कोणी ठेवायचा विचार देखील करणार नाही.
एवढंच नाही तर 1999 मध्ये एक्स डॉट कॉम ही बँकिंग क्षेत्राशी संबंधित वेबसाईट सुरु केली होती, जे पुढं सोबत Paypal म्हणून ओळखलं गेली, गेल्या वर्षी 27 ऑक्टोबर 2022 ला ट्विटर विकत घेतल्यावर
इलोन सतत चर्चेत राहिले कारण, ट्विटर चे CEO पराग अग्रवाल सह कित्येक लोकांना नारळ दिला. हा आकडा 7500 वरून 2700 वरती आला, म्हणजे विचार करा किती लोकांना घरी बसवलं.
हे तर सोडाच ज्या उपद्रवी लोकांची ट्विटर अकाउंट बंद केलेली होती कम्युनिटी गाईडलाईन्सच्या उल्लंघण केल्यामुळे.त्या बड्या लोकांना पुन्हा व्यासपीठ दिलं गेलं यात डोनाल्ड ट्रम्प देखील आहेत.
त्यानंतर पैसे टाका ब्लू टिक मिळवा योजना आणली. आणि मग इलोन ने मागे वळून पाहिलंच नाही...
ब्लू टिक गेल्याने खास वलय असलेली मंडळी सुद्धा नाराज झाली इतकंच नाही तर कित्येक युजर्स नव्या अपडेट्स मुळे गोंधळून गेले आणि योग्य संधी साधत योग्य वेळी फेसबुकच्या मेटा कंपनी ने थ्रेड्स हे नवं अँप सुरू केलं.
जे तंतोतंत ट्विटर सोबत मिळतं जुळतं असल्यासारखं दिसून येतं... आणि तिथं नेटिझन्स ने उद्या मारल्या... सगळ्यांच्या पसंतीस उतरलं.
इलोन आणि 'X' हे नातं नेमकं आहे तरी काय? हे 'X' आलं तरी कुठून? या सगळ्या कुटणीती मागे दडलंय तरी नक्की काय? याचं कुतूहल सर्वांना नक्की पडलं असेल. हे जर पाहायला 26 वर्षांपूर्वीचा इतिहास उकरून काढावा लागेल.
जेव्हा या 'X' ची सुरुवात बँकिंग क्षेत्रात झालेली तेव्हा इलोन ने ट्विट करून सांगितलं होतं की या 'X' सोबत त्यांची भावनिक जोड आहे. कदाचित त्यांना 'X' लकी असावा, म्हणून त्यांचं सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये 'X' वरील प्रेम दिसून येतं.
इलोनच्या डोक्यात काय शिजतं आहे? हे कोणाला कळू शकणार नाही मात्र, माहित नाही भविष्यात पृथ्वीवर राहणं कठीण असल्याचं तो म्हणतो, शिवाय 2050 पर्यंत पृथ्वीला पर्यायी ग्रह शोधावा लागेल जिथं मानव जाऊन राहील
आणि त्यांच्या मते तो ग्रह मंगळ आहे, आणि मंगळ मोहिमा स्पेस एक्स ने सुरू केलेल्या आहेतच. हे सगळं असताना मध्यंतरी ट्विटर विकत घेण्यास योग्य व्यक्ती मिळाला तर त्याला ते विकून टाकेल असंही ट्विट त्यांनी केलेलं.
डोंगरा एवढी छोटी गोष्ट असल्यासारखं म्हणावं लागेल.
इलोन पुढे काय करणार आहेत हे आपण तर पाहतच राहणार आहोतच मात्र, ट्विटर सोबतच्या टीव-टीव आठवणी काळाच्या ओघात पडद्याआड जाणार आहेत त्यामुळं जरी इलोन यांच्या साठी 'X' हा त्यांचा भावनिक मुद्दा असेल तर मात्र सामान्य ट्विटर वापरकर्त्या, ट्विटरच्या चाहत्यावर्गासाठी ट्विटरची चिमणी हा त्यांचा भावनिक मुद्दा का असू शकत नाही? त्याचा विचार कोण करणार? कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्म सोबत आज प्रत्येकाच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत, कोणाला प्रेम मिळालं, कोणाला मदत झाली, कित्येकांचं आयुष्य बदललं, रोजगार मिळाले... हरवलेली माणसं जोडली गेली कित्येक भन्नाट किस्से या सोशल माध्यमाचा साक्षीने झाले आहेत.... तर याच माध्यमांचे मालक निळ्याचं काळं करणार असतील, मनमर्जी गोष्टी लादणार असतील तर प्रत्येक नेटिझन्स, युजर्सने या सोशल अँप प्रति भावनिक होऊन चालणार नाही... सोशल मीडियाची ताकद आज आक्ख जग ओळखून आहे. अश्या वेळी या माध्यमांची मालकी विकत घेऊन आपले स्वतःचे विचार सर्वांच्यावर लादणं कितपत योग्य असेल? किंवा आम्ही जे दाखवू तेच तुम्ही पाहणार तेच तुम्ही वाचणार आणि नेटिझन्स आपला मौल्यवान वेळ फक्त स्क्रोलिंग वर घालवणार? सोशल माध्यमांवर वेळ देताना सोशल माध्यम तुम्ही तिथं लाखो संख्येने आहात, तुम्ही काय सर्च करता? काय पाहता? काय खरेदी करता? या सगळ्या माहिती वरून त्यांचा अजेंडा चालवणार...
विनीत वैद्य यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग
मृत्यूस कारण की...
पैश्याच सोंग...
दोन दगडांवर पाय...
झेपावे मिलियन्सकडे...
डिजिटल डिस्टन्स
(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही)