Surya Shani Shukra Yuti 2025: मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! 3 ग्रहांचा महासंयोग, 'या' 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू, राजासारखं जीवन जगाल
Surya Shani Shukra Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, 29 मार्चच्या रात्रीपासून 3 राशींचे भाग्य चमकू शकते. सूर्य, शुक्र आणि शनीच्या संयोगाची निर्मिती कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल? जाणून घ्या..

Surya Shani Shukra Yuti 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वर्षात ग्रहांच्या अनेक मोठ्या घडामोडी होताना दिसणार आहे. ज्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम अनेक राशींवर होताना दिसणार आहे. त्यात मार्च हा महिना तर अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा ग्रह राशी बदलतात किंवा कोणत्याही एका राशीमध्ये संयोग बनवतात तेव्हा त्याचा सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. सध्या सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह मीन राशीत महासंयोग बनवत आहेत. लवकरच सूर्य आणि शुक्राचा शनिसोबत संयोग होणार आहे, ज्याचा काही राशींसाठी शुभ आणि इतरांसाठी अशुभ प्रभाव असू शकतो.
शुक्र, शनि आणि सूर्य यांचा संयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार, 29 मार्च रोजी रात्री 11:01 वाजता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. यासह, शनि मीन राशीत आधीपासूनच उपस्थित असलेल्या शनि ग्रहाशी संयोग घडवेल. अशा स्थितीत मीन राशीत शुक्र, शनि आणि सूर्य या तीन ग्रहांचा संयोग होईल. जाणून घेऊया कोणत्या 3 राशींचे भाग्य यामुळे चमकू शकते?
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी शुक्र, शनि आणि सूर्याचे संक्रमण फलदायी ठरेल. देशाबाहेर जाण्याची योजना आखू शकता. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. विवाहितांसाठी काळ चांगला राहील. तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. नवीन योजनांवर काम कराल आणि यशही मिळेल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र, शनि आणि सूर्य यांचा योग लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकते. आर्थिक नुकसानीपासून बचाव होईल. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात रुची वाढू शकते. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होऊ शकतात. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित कामात यश मिळेल. करिअरमध्ये यश मिळू शकते.
कुंभ
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी यश मिळवू शकाल. नवीन योजनांवर काम कराल आणि यश मिळेल. तिन्ही ग्रहांचा संयोग तयार होत आहे जो फायदेशीर ठरू शकतो. जोडीदाराशी संबंध सुधारू शकतात. मनात उत्साह राहील.
हेही वाचा>>
Shani Transit 2025: आनंदवार्ता! शनी साडेसाती, ढैय्यापासून 'या' 3 राशींची होणार सुटका! गोल्डन टाईम सुरू होतोय, यश चालून येणार!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

