Watch : हॉकी विश्वचषक सामन्यादरम्यान महिला खेळाडूची बॉयफ्रेंडला किस, भर मैदानात केलं प्रपोज, पाहा VIDEO
Hockey World Cup : अनेकदा फुटबॉलच्या मैदानात खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडला प्रपोज करताना दिसतात, पण आता थेट हॉकीच्या मैदानात एका महिला खेळाडूने आपल्या बॉयफ्रेंडला किस करत प्रपोज केलं आहे.

Women Hockey World Cup, Francisca Tala Video : खेळाच्या मैदानात खेळाडू आपल्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडला प्रपोज करतानाचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. अनेकदा फुटबॉलपटूंचे असे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता चक्क एका महिला हॉकीपटूने भर मैदानात आपल्या बॉयफ्रेंडला किस करत प्रपोज केलं आहे.महिला हॉकी विश्चचषकाच्या नेदरलँड विरुद्ध चिली (NED vs CHI) सामन्यात चिलीच्या फ्रांसिस्का ताला (Francisca Tala) हिने गोल केल्यानंतर बॉयफ्रेंडला प्रपोज करत किस केली. या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या महिला हॉकी विश्वचषक सुरु असून नुकताच नेदरलँड विरुद्ध चिली (Chile vs Netherlands) सामना पार पडला. या सामन्यात चिलीचा संघ नेदरलँडकडून 3-1 ने पराभूत झाला. पण चिलीकडून एकमेव गोल झळकावणाऱ्या फ्रांसिस्का ताला हिच्यासाठी मात्र सामना यादगार ठरला. तिने गोल केल्यानंतर धावत जाऊन प्रेक्षकांमध्ये बसलेल्या आपल्या बॉयफ्रेंडला प्रपोज केला, ज्यानंतर त्याने होकार देखील दिला. दोघांनी यावेळी एकमेंकाना किस देखील केली असून या सर्वाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ -
"I made a bet with the girls that if I made a goal against the Netherlands, I had to marry my boyfriend."
— Watch.Hockey (@watchdothockey) July 6, 2022
"He said yes!" 💍
This interview with @chile_hockey's Francisca Tala is everything 🤣🙌 #HWC2022 pic.twitter.com/qVI0QcEhvC
सामन्यानंतर फ्रांसिस्काने पत्रकार परिषदेत बोलताना कबूल केले की तिने सामन्यापूर्वी सोबती खेळाडूंना सांगितले होते की, जर तिने सामन्यात गोल केला तरच प्रियकराला प्रपोज करुन लग्न करेल. दरम्यान तिने यशस्वी गोल केल्यानंतर या सर्वाबाबत सांगितलं आणि तिचे सर्व टीममेट्स देखील आनंदी असल्याचं यावेळी तिने सांगितलं.
हे देखील वाचा-
- Wimbledon 2022 Final: नोवाक जोकोविचला रॉजर फेडररचा आणखी एक विक्रम मोडण्याची संधी !
- India Tour Of Zimbabwe: वेस्ट इंडीजनंतर भारताचा झिम्बॉवे दौरा; कधी, कुठे रंगणार सामने? येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
- Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजा चेन्नईची साथ सोडणार? इंस्टाग्रामवरून हटवल्या सीएसके संबंधित सर्व पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
