Ravindra Jadeja: रवींद्र जाडेजा चेन्नईची साथ सोडणार? इंस्टाग्रामवरून हटवल्या सीएसके संबंधित सर्व पोस्ट
Ravindra Jadeja Removes CSK Related Posts: चेन्नईचा (CSK) माजी कर्णधार रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवरून चेन्नई सुपरकिंग्ज संबंधित सर्व पोस्ट हटवल्या आहेत.
Ravindra Jadeja Removes CSK Related Posts: चेन्नईचा (CSK) माजी कर्णधार रवींद्र जाडेजानं (Ravindra Jadeja) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकांऊटवरून चेन्नई सुपरकिंग्ज संबंधित सर्व पोस्ट हटवल्या आहेत. महत्वाचं म्हणजे, रवींद्र जाडेजानं इंस्टाग्रामवरून सीएसके संबंधित पोस्ट का हटवल्या? याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, रवींद्र जाडेजा चेन्नईचा संघ सोडणार का? अशा चर्चांना उधाण आलंय. आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद रवींद्र जाडेजाकडं सोपवलं होतं. मात्र, त्यांच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली.त्यानंतर रवींद्र जाडेजानं पुन्हा धोनीकडं चेन्नईच्या संघाची जबाबदारी सोपवली.
जाडेजाचा चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आठ पैकी सहा सामने गमावले. याशिवाय, कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या रवींद्र जाडेजाला या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं 10 सामन्यात 20 च्या सरासरीनं फक्त 116 धावा केल्या.तर, 7.51 च्या इकोनॉमी रेटनं फक्त पाच विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्यानं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
जाडेजानं सीएसके संबधित सर्व पोस्ट हटवल्या
कर्णधारपद सोडल्यानंतर काही दिवसानंतर दुखापतीमुळं रवींद्र जाडेलाला दुखापत झाली. ज्यामुळं त्याला आयपीएलच्या पंधराव्या हंगामातून बाहेर पडावं लागलं. परंतु, रवींद्र जाडेजाला संघातून बाहेर काढण्यात आलं, असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यानंतर आता रवींद्र जाडेजानं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मागील तीन वर्षांचे सीएसके संबधित सर्व पोस्ट हटवल्यानंतर नव्या चर्चांना उधाण आलंय. तसेच रवींद्र जाडेजा चेन्नईचा संघ सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
दुखापतीमुळं रवींद्र जाडेजा आयपीएलमधून बाहेर?
सीएसकेच्या कर्णधारपदावरून हटवणं जडेजाच्या नाराजीचं कारण असू शकतं. हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी जडेजाला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. फलंदाजी आणि गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यानं कर्णधारपद सोडलं, असं सीएसकेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच जाडेजा आयपीएलमधून बाहेर पडला. सीएसकेच्या सीईओंनी वारंवार दुखापत हेच जडेजा बाहेर होण्याचं कारण सांगितलं.
हे देखील वाचा-