Shikhar Dhawan : धवनचं शतक हुकलं, सहाव्यांदा झाला 'नर्व्हस 90' चा शिकार, पण एक खास रेकॉर्ड केला नावावर
IND vs WI 1st ODI : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या शिखरने 97 धावांची धडाकेबाज खेळी केली. यावेळी त्याने एक खास रेकॉर्ड नावावर केला आहे.

Shikhar Dhawan Nervous 90s : भारत आणि वेस्ट इंडीज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने तीन धावांनी जिंकला. यावेळी कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) धमाकेदार फलंदाजी करत 97 धावा ठोकल्या. केवळ 3 धावांनी त्याचं शतक हुकलं ज्यामुळे 90 हून अधिक धावा करुनही शतक न झळकावण्याची त्याची ही सहावी वेळ ठरली. क्रिकेटच्या भाषेत यालाच 'नर्व्हस 90' म्हणत असून सहाव्यांदा शिखर याचा शिकार झाला. पण कर्णधार म्हणून शिखरने अर्धशतक पूर्ण केल्याने भारतासाठी सर्वाधिक वयात अर्धशतक झळकावणारा खेळाडू शिखर बनला आहे.
शिखरने 36 वर्षे 229 दिवसांचा असताना भारतासाठी एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. शिखरच्या आधी हा रेकॉर्ड मोहम्मद अझहरुद्दीन याच्या नावावर होता. अझहरुद्दीनने 36 वर्षे 120 दिवसांचा असताना ही कर्णधार म्हणून खेळत अर्धशतक पूर्ण केलं होतं. त्यानंतर या यादीत सुनील गावस्कर (35 वर्षे 225 दिवस), एमएस धोनी (35 वर्षे 208 दिवस) आणि रोहित शर्मा (35 वर्ष 73 दिवस) यांचा समावेश आहे.
सहाव्यांदा 'नर्व्हस 90' चा शिकार
या सामन्यात 97 धावा करुन शिखर बाद झाला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 90 पेक्षा अधिक धावा करुनही शतक न झळकावता आल्याची शिखरची ही सहावी वेळ आहे. यामुळे शिखर अशाप्रकारे बाद होण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर सचिन तेंडुलकर (18) तर दुसऱ्या स्थानावर मोहम्मद अझहरुद्दीन (7) आहे.
हे देखील वाचा-
- Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नी राधिकानं दिली गुड न्यूज!
- WI vs IND: विकेटकिपर म्हणावं की सुपरमॅन, सामना हातातून निसटताना संजू सॅमसनची जबरदस्त फिल्डिंग!
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
