Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार, पत्नी राधिकानं दिली गुड न्यूज!
Ajinkya Rahane to become father for Second time: भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे.
Ajinkya Rahane to become father for Second time: भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरात दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. अजिंक्यची पत्नी राधिका धोपावकरनं (Radhika Dhopavkar) तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून बेबी बंपचा फोटो शेअर करून ही गुड न्यूज दिलीय.
अजिंक्य रहाणे आणि राधिका लहानपणापासून मित्र होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबईत लग्न केलं. त्यानंतर 5 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर आता पुन्हा अजिंक्य रहाणेच्या घरात पाळणा हलणार आहे. त्याची पत्नी राधिकानं नुकताच इन्टाग्रामवर बेबी बंपचा फोटो पोस्ट करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती दिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं बेबी बंप आणि हार्ट इमोजीसह 'आक्टोबर 2022' असं लिहलंय. म्हणजेच, ऑक्टोबर 2022 मध्ये राधिका दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं तिच्या पोस्टवरून स्पष्ट होतंय. राधिकाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिचं अभिनंदनही केलंय.
इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. मात्र, त्यानंतर त्याच्या कामगिरीत सातत्यानं घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. रहाणेनं भारतासाठी आतापर्यंत 82 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं 38.5 च्या सरासरीनं 4 हजार 931 धावा केल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 2 हजार 962 धावांची नोंद आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याला 375 धावा करता आल्या आहेत.
आयपीएलमध्ये अंजिक्य रहाणेची कामगिरीत सातत्यानं घसरण
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना अजिंक्य रहाणेनं निराशाजनक कामगिरी केली. अजिंक्य रहाणेनं आतापर्यंत आयपीएलच्या 153 सामन्यात 31.53 च्या सरासरीने आणि 121 च्या स्ट्राइक रेटने 3941 धावा केल्या आहेत. तो पूर्वी मर्यादित षटकांचा उत्तम असा फलंदाज मानला जात होता. परंतु, काही कालांतरानं तो केवळ कसोटी क्रिकेटमध्येच राहिला. आता कसोटी संघातूनही बाहेर पडल्यानंतर रहाणेच्या कारकिर्दीवर संकट आलंय.
हे देखील वाचा-
- WI vs IND: विकेटकिपर म्हणावं की सुपरमॅन, सामना हातातून निसटताना संजू सॅमसनची जबरदस्त फिल्डिंग!
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!
- Nashik Earthquake : नाशिकच्या पेठसह त्र्यंबक तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, अफवांवर विश्वास ठेवू नका!